28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईमुंबई-मांडवा वॉटरटॅक्सीचा तीन महिन्यांतच शटर डाऊन!

मुंबई-मांडवा वॉटरटॅक्सीचा तीन महिन्यांतच शटर डाऊन!

मुंबई ते मांडवादरम्यान चालणाऱ्या वातानुकूलित हायस्पीड वॉटरटॅक्सीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्यानंतर प्रशासनाकडून ही वॉटरटॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांकडून अजिबातच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर मुंबई क्रुझ टर्मिनल-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. (Mumbai-Mandwa water taxi shutter down within three months!)

मुंबई बंदर प्राधिकरण तसेच महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईकरांच्या सेवेत भारतीय बनावटीची अत्याधुनिक वातानुकूलित हायस्पीड वॉटरटॅक्सी सेवा सुरू केली. जलवाहतूक व्यवस्था बळकट करून मुंबई आणि मुंबई महानगरातील प्रवास सुकर, अतिजलद व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे तीन महिन्यांतच वॉटरटॅक्सीचा शटर डाऊन झाल्याचे चित्र आहे.

मुंबई क्रुझ टर्मिनल-मांडवा अशी आठवड्यातील सातही दिवस वॉटरटॅक्सी सेवा सुरू झाली होती. या वॉटर टॅक्सीमुळे केवळ ४० मिनिटांत मांडव्याला जाणे शक्य होऊ लागले. पर्यटकांचे आकर्षणाचे पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागला जाणाऱ्यांकडून या सेवेला प्रतिसाद मिळेल या विश्वासाने ही सेवा सुरू करण्यात आली. यासाठी ४०० ते ४५० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले. मात्र सुरुवातीपासून या सेवेला प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे कंपनीने तिकीट दर देखील कमी केले. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर डिसेंबरमध्ये सात दिवसांऐवजी केवळ दोन दिवस या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सोमवार ते शुक्रवारदरम्यानची सेवा बंद करण्यात आली. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल असे कंपनीला वाटत होते. मात्र या दिवशीही प्रतिसाद न मिळाल्याने आता शनिवार रविवारच्या मुंबई- मांडवादरम्यानच्या दोन फेऱ्याही पूर्णतः बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : Mumbai-Mandwa Water Taxi : मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून धावणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

Mumbai water transport projects : मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाचणार!

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सीची सेवा सुरू

नवी मुंबई व मुंबई जलवाहतुकीने जोडण्यासाठी बेलापुर ते गेटवे ऑफ इंडिया या जलसेवा प्रारंभ करण्यात आला आहे. बेलापुर ते गेटवे ऑफ इंडिया या जलप्रवास सेवेला बेलापुर येथून हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे नागरिकांना एका तासात मुंबई शहर गाठता येणार आहे. तसेच वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ही मदत होणार आहे. याचे आधीचे दर कमी करून प्रवाशांना परवडेल असे दर ठेवण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जलप्रवासचे दर आणखी कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जळवाहतुकीच्या फेऱ्यांची संख्याही प्रतिसदानुसार वाढविण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी