29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी सांगितले, 'गद्दारां'चे काय होणार ते ?

उद्धव ठाकरेंनी सांगितले, ‘गद्दारां’चे काय होणार ते ?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला असून शिवसेना एकाच आहे आणि यापुढेही ती एकच राहणार असल्याचे म्हंटले आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर केलेल्या दाव्यावर ठाकरे यांनी टीका केली आहे. मागील सहा सात महिने शिवेसनेचे काय होणार? शिवसेनेला पुन्हा धनुष्य बाण मिळणार की नाही? पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे काय होणार? असे प्रश्न अनेकांना सतावत आहेत. शिवसेना एकच आहे आणि यापुढेही ती एकच असणार आहे. त्यामुळे मी दुसरी शिवसेना मनातच नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्री निवासस्थानी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. (Uddhav Thackeray said, what will happen to ‘traitors’?)

ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसते. त्यासाठीच आम्ही तो शब्द गोठवला किंवा तसाच ठेवला. त्यानंतर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि गेली काही वर्षं मी कारभार बघतोय. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे, ते आता शिवसेनेची घटनाच त्यांना मान्य नसल्याचे सांगत आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार त्यांनी काही पदांची निर्मिती केली. त्यात विभागप्रमुख हे पद आहे. आयोगाने सांगितलेल्या गोष्टींची आम्ही पूर्तता केली आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आम्ही सादर केली आहेत. आमची सदस्यसंख्याही आम्ही दाखवली आहे.”

Uddhav Thackeray said, what will happen to 'traitors'?

नेमके काय होणार? असा प्रश्न आमच्यासोबत असलेले आणि जनतेला सतावत आहे. त्यासारख्या मनात हाच संभ्रम आहे. कोणतेही पक्ष जनतेच्या पाठिंब्यावर स्थापन होत असतो. शिवसेनाप्रमुखांनीही १९६६ साली त्याची स्थापना केली. जर का पक्ष केवळ निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहाणार असले तर उद्या कोणीही म्हणजे जगातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. त्या पक्षाला काही अर्थ नाही. त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष हा दोन पातळीवर असतो. एक वैधानिक म्हणजे विधिमंडळ, दुसरा संसदीय आणि त्यापलीकडचा मोठा पक्ष रस्त्यावरचा असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो. जी घटना शिवसेनेला आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात, असे ठाकरे म्हणाले.

दोनच दरबार महत्वाचे

दिल्लीत अनेक दरबार आहेत, त्यातील दोन महत्वाचे दरबार म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या १४ तारखेपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे मांडले आहेत, वाद प्रतिवाद झाला आहे. दावे-प्रतिदावे झाले आहेत, निवडणूक आयोगाने मागील ३० तारखेला आपले म्हणणे लिखित स्वरूपात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. शिवसेनेने जे मुद्दे होते ते निवडणूक आयुक्तांच्या समोरही मांडले आहेत आणि लिखित स्वरूपातही दिलेले आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे स्वतःची घटना बनवली आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात. या वेळची निवडणूक मागील २३ जानेवारीला होणे अपेक्षित होतं, निवडणूक आयोगाकडे ती घेण्याची परवानगी आम्ही मागितली होती. आणि नसेल तर जसं चालू आहे तसे चालू राहू देत. अद्याप तशी परवानगी मिळालेली नाही. परंतु शिवसेनेच्या घटनेनुसार पदे निर्माण केली आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!

Uddhav Thackeray : ‘ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला निघाले आहेत’

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराची राजापुरात हत्या ; पोलिसांनी आरोपी आंबेरकरच्या मुसक्या आवळल्या

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी