25 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमुंबईअंधेरी ते बोरिवली 20 मिनिटांत तेही अवघ्या 40 रुपयांत!

अंधेरी ते बोरिवली 20 मिनिटांत तेही अवघ्या 40 रुपयांत!

मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुककोडींमुळे ऐरवी वैतागलेल्या मुंबईकरांना मुंबई मेट्रोमुळे (Mumbai Metro) अंधेरी ते बोरिवली रस्तेमार्गावरुन होणार दीड तासांचा प्रवास २० मिनिटांवर आणि २५० रुपये प्रवास खर्च अवघ्या २० रुपयांवर आल्यामुळे आनंदाला पारावार राहिलेला नाही. मुंबईतील एका महिला प्रवाशाने नुकत्याच लोकार्पण झालेल्या मुंबई मेट्रो प्रवासाचा अनुभव ट्विटरवर सांगत मंबईकरांसाठी मेट्रो वरदान असल्याचे म्हटले आहे. (Mumbai Metro is preferred by commuters, saving time and money too)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ ‘अ’चे लोकार्पण केले होते. त्यानंतर आता मुंबईकर मेट्रो प्रवासाला पसंती देत असून मेट्रोची प्रवासी संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या शुक्रवार अखेर दोन्ही मार्गांवरील प्रवासी संख्या जवळपास ५० ते ६० हजारांहून अधिक झाली आहे. मेट्रोमुळे प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव येत असून दररोजच्या वाहतूककोंडीच्या कटकटीतून त्यांची सुटका झाली आहे. तसेच प्रवाशांचे पैसे देखील वाचत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची मेट्रोला दिवसेंदिवस पसंती वाढत असल्याचे दिसत आहे.

एका महिला प्रवाशाने आपला मेट्रोप्रवासाचा अनुभव ट्विटरवर शेअर करताना म्हटले आहे की, ”आज बोरिवलीला जाण्यासाठी मेट्रोतून प्रवास केला. साधारण अंधेरी ते बोरिवली प्रवासाला दिड तास लागतो आणि त्यासाठी अॅटो रिक्षासाठी २५० रुपये मोजावे लागतात. मात्र मेट्रोतून हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत झाला आणि तो देखील अवघ्या ४० रुपयांत. मुंबईकरांसाठी हे किती मोठं वरदान आहे.”


मुंबई मेट्रोचा हा अनुभव शेअर करताना या प्रवाशाने मुंबईकरांसाठी मेट्रो हे वरदान असल्याचे म्हटले असून, मेट्रोमुळे मुंबईकरांची किती मोठी सोय झाली आहे हे या ट्विटमधून जाणवते. येत्या काही काळात मुंबईत मेट्रोचे जाळे आणखी वाढणार असून प्रवासात होणारी गैरसोय देखील कमी होणार आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो २ ‘अ’ या मार्गांना अल्पावधीत प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या मधून जातात त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या येत्या काही काळात कमी होऊन या मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी