29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमंत्रालयIAS योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

IAS योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

रायगडच्या जिल्हाधिकारीपदी( Raigad Collector) आयएएश योगेश म्हसे (IAS Yogesh Mhse) यांची सोमवारी (दि.२३) रोजी नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आज योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (IAS Yogesh Mhse appointed as Raigad Collector)

योगेश म्हसे हे यापूर्वी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास (म्हाडा)च्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.च्या महाव्यवस्थापक तसेच भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त, पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची आजवर ख्याती राहिलेली आहे.

हे सुद्धा वाचा

IAS अधिकाऱ्याची उत्कृष्ट कामगिरी, निवडणूक आयोगाने घेतली दखल !

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन

IAS Transfers : राजेश पाटील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, भाग्यश्री बानायत यांची महिनाभरात तिसरी बदली

आज सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी रायगड जिल्हाधिकारीपदी योगेश म्हसे यांची नियुक्ती केली आहे. लवकरच ते जिल्ह्याचा कारभार हाती घेणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी