28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयनांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा; चारही बाजार समित्यांमध्ये वर्चस्व

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा; चारही बाजार समित्यांमध्ये वर्चस्व

राज्यातील बाजार समित्यांचे निकाल शनिवार आणि रविवारी जाहीर होत आहेत. आज नांदेड जिल्ह्यातील भोकर, हिमायतनगर, नायगाव, कुंटूर बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले, तर उद्या नांदेड बाजार समितीचा निकाल जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे चारही बाजार समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व ठेवले आहे. कुंटूर बाजार समितीत भाजपसोबत काँग्रेसने युती करत विजय मिळवला आहे. या चारही निकालांवरुन अशोक चव्हाण यांनी आपला जलवा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.

भोकर बाजार समितीमध्ये 18 पैकी 13 जागांवर काँग्रेस, दोन जागांवर राष्ट्रवादी, तर तीन जागांवर भाजपचे उमेद्वार विजयी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. या मतदारसंघातील बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. तेथे अशोक चव्हाण यांनी जास्तीजास्त काँग्रेसचे उमेदवार निवडूण आणले आहेत.

हिमायतनगर बाजार समितीमध्ये देखील काँग्रेसने जबरदस्त विजय मिळवला आहे. या बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे. हिमायतनगर बाजार समितीत भाजप, शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. तर नायगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ठिकाणी काँग्रेसला 12, तर भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत. कुंटूर बाजार समितीत काँग्रेसला 13 आणि भाजपला 5 जागा मिळाल्या आहेत. कुंटूरमध्ये काँग्रेस आणि भाजपने युती करत ही बाजार समिती बिनविरोध केली.

हे सुद्धा वाचा

प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार?

मालेगावात अद्वय हिरेंनी करुन दाखवलं; बाजार समितीत दादा भुसेंच्या पॅनलची धूळधाण

विटा बाजार समितीत शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या महायुतीची राष्ट्रवादीला छोबीपछाड

बीआरएसला एकही जागा नाही

तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसने नांदेड जिल्ह्यात पहिली सभा घेत महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीत देखील त्यांनी आपले उमेदवार उतरविले. राज्यात नांदेड, औरंगाबाद येथे बीआरएसने पक्षाचा विस्तार सुरु केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी बीआरएस करत असून त्या दृष्टीने बाजार समिती निवडणुकीत बीआरएसने उमेदवार उतरविले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी