26 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमुंबईअंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

स्वयंघोषित चमत्कारी पुरुष धीरेंद्र महाराज आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम मानव यांच्यातील वादात आता भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनीही उडी घेतली आहे. भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी श्याम मानव यांच्या विज्ञाननिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनकार म्हणवून घेणारे कित्येकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, (BJP Ram Kadam criticized Shyam Manav  does not believe in science either) अशी खोचक टीका राम कदम यांनी श्याम मानव यांच्यावर केली आहे. मानव यांचा बोलविता धनी दुसराच असल्याचे सूचित करत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शाम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांनी केलेल्या दाव्यांवर आघात केला असून त्यांनी ते विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवावे असे आव्हान केले आहे. आजपर्यंत जगात ‘टेलीपथी’ सिद्ध झालेली नाही. महाराजांनी ती विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखविली तर त्याचा देशाच्या सुरक्षेसाठीदेखील फायदा होईल, अशा शब्दांत श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. मात्र, भाजपचे नेते राम कदम हे आता धीरेंद्र महाराजच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. ते म्हणाले,”स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे अनेकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे.” पुढे श्याम मानव यांनी केलेली टीका म्हणजे राहुल गांधींची स्क्रिप्ट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, आमच्या साधू-संतांवर टीका केल्यानंतर श्याम मानव लगेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतात.

हे सुद्धा वाचा 

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे’ काम पाहा …

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

 

हे तर काँग्रेसचे षडयंत्र
राम कदम यांनी श्याम मानव यांच्यामागे काँग्रेस पक्ष असल्याचा आरोप केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलनकार जी टीका करत होते, ती राहुल गांधींची स्क्रिप्ट होती का? हे सर्व काँग्रेसने ठरवून केलं होतं का? असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नसल्याचे सांगत हे काँग्रेसचे षडयंत्र तर नाही ना? अशी शंकाच राम कदम यांनी व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू…
शाम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांनी उघड आव्हान दिले आहे. ते म्हणाले, धीरेंद्र महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी ९० टक्के जरी खऱ्या ठरल्या तरी आम्ही हे कबुल करू की त्यांच्याकडे खरोखरच दिव्य शक्ती आहे. त्यांनतर आम्ही आमच्या समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक देऊ. मी श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संस्थापक धीरेंद्र महाराजांच्या पायांवर डोके ठेवीन. त्यांची माफी मागेन. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील ४० वर्षे काम करीत आहे. हजारो बाबांचा, मांत्रिकांचा, देवी-देवता शरीरात आणणाऱ्या लोकांचा आणि ज्योतिषांचे पितळ उघडे पडले आहे. तसेच नागपूरला ‘पोलखोल शहर’ अशी प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. ती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू आणि तुमची जाहीरपणे माफीही मागू,असे श्याम मानव म्हणाले.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी