25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमुंबई‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत…उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे (Mumbai Police) कायदे आहेत की नाही?’ असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत (Urfi Javed outfit) संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीमुळे प्रसिद्धीस आली. तिच्या कपड्यांच्या फॅशनमुळे ती सध्या चर्चेत असते. मुंबईतील रस्त्याकडेला कारमधून तोकड्या कपड्यात उतरतानाचा उर्फी जावेदचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. Urfi Javed outfit angered Chitra Wagh

चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यात मुंबई पोलिसांना  टॅग करत उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी देखील केली आहे. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होत आहेत तर ही बया अजून विकृती पसरवतेय असे देखील त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

उर्फी जावेद ही बिगबॉस फेम अभिनेत्री सध्या तीच्या तोकड्या कपड्यांच्या फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियात तिची जोरदार क्रेझ आहे. तिचा अशाच तोकड्या कपड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ती मुंबईच्या एका रस्त्यावर कारमधून उतरुन जात आहे. त्यावेळी अनेक फोटोग्राफर तीचे फोटो काढण्यासाठी धडपडत आहेत. तर काही जण तीला प्रश्न देखील विचारताणा दिसत आहेत. या व्हिडीओवरुन चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून त्यांनी मुंबई पोलिसांना तुमच्याकडे आयपीसी आयआरपीसी कायदा आहे की नाही असा देखील सवाल त्यांनी केला आहे.

चित्रा वाघ या महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. उर्फी जावेद या अभिनेत्रीच्या कपड्यांवरु लक्ष्य करत अशा विकृतीमुळे महिला विकृतांची शिकार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी