31 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरमुंबईउर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली ...म्हणून मला दोषी ठरवतात

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ ट्विट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत…उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ असा सवाल करत उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी ट्विटरवर मुंबई पोलिसांकडे केली होती. या ट्विटला उर्फी जावेदने देखील प्रत्युत्तर (Urfi Javed reply to Chitra Wagh) देत म्हटले आहे की, राजकारणी स्वत: लोकांच्या नजरेत येण्यासाठी ते मला टार्गेट करत आहेत. बलात्कारासाठी ते माझ्या कपड्यांवरुन दोषी ठरवणे त्यांना सोईचे वाटते. असे म्हटले आहे.  (unemployment, pending cases of rape)

उर्फी जावेदने ट्विट करत म्हटले आहे की, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन तुमच्यासारखे राजकारणी नेहमीच वेगळे वळण देतात. जनतेचे लक्ष माझ्या विषयावरुन विचलीत करता, पण ज्या महिलांना खरचं मदतीची गरज आहे त्यांना का मदत करत नाही? महिलांचे शिक्षण, लाखोंच्या संख्येने प्रलंबित असलेल्या बलात्काराच्या केसेस यात का लक्ष घालत नाही.
तर दुसऱ्या रिप्लायमध्ये उर्फी जावेदने म्हटले आहे की, आजच्या राजकारण्यांना पाहून खूपच वाईट वाटते. स्वत: लोकांच्या नजरेत येण्यासाठी ते मला टार्गेट करत आहेत. बलात्कारासाठी ते माझ्या कपड्यांवरुन दोषी ठरवणे त्यांना सोईचे वाटते. मात्र आणखी देखील मुद्दे आहेत. जसे की, बेरोजगारी, बलात्काराचे प्रलंबित खटले, खुन त्यांचे काय असा सवाल तीने केला आहे.


चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग करत उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी देखील केली आहे. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होत आहेत तर ही बया अजून विकृती पसरवतेय असे देखील त्यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे. या ट्विटला उर्फी जावेदने प्रत्यूत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा 

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

ऋषभ पंत घाबरलेला होता, थरथरत होता; वाचविणाऱ्याला म्हणाला, आधी आईला कॉल करा..

अजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक
उर्फी जावेद ही तीच्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तीची क्रेझ पहायला मिळते. मुंबईत तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा व्हिडीओ ट्विट करत तीला अटक करण्याची मागणी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी