29 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
HomeमुंबईUrmila Matondkar : शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार, शिवसेनेच्या कोट्यातून विधान...

Urmila Matondkar : शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार, शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी १२ जणांच्या नावांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली आहे. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेकडून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या नावाची  शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्याला मातोंडकर यांनीही होकार दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा होती. दरम्यान, राऊत यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मातोंडकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

नुकतेच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलेच फैलावर घेतले होते. मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसेच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. सध्या उर्मिला कोणत्याच पक्षात नसून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास प्रियांका चतुर्वेदी यांच्याप्रमाणे एक फायरब्रँड महिला नेता शिवसेनेला मिळणार आहे. प्रमुख व्यासपीठांवर शिवसेनेची भूमिका प्रवक्ता म्हणून जोरकसपणे मांडण्याचा हेतुही साध्य होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी