25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमुंबईयेत्या 3-4 दिवसांत मुंबईसह राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

येत्या 3-4 दिवसांत मुंबईसह राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

संपूर्ण उत्तर भारतात हवामान झपाट्याने बदलत आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भात आज 15 मार्च ते 18 मार्च या काळात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे. (weather news)

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. या काळात राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे. 15 ते 18 मार्च या कालावधीत याची तीव्रता वाढू शकते. त्या काळात कमाल तापमान दोन अंशांनी घटू शकेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभाग अधिकाऱ्यांनी दिली.

त्याचप्रमाणे येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी ३६.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथील किनारी वेधशाळेत ३५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हे दोन्हीही तापमान सामान्य तापमानापेक्षा चारअंशांनी जास्त आहे. त्यामुळे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 

भारत सरकार देतंय 28 दिवसांचे रिचार्ज फ्रि? वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

महिलांनी गरोदरपणात कॉफी पिणे आयुष्याला हानिकारक; एकदा वाचाच !\

शॉर्ट टर्म लोनचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या एका क्लिकवर

त्यामुळे सोसाटय़ाचा वारा, वादळ सदृश परिस्थिती आणि विजांच्या कडकडाटाची परिस्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी घराबाहेर न पडण्याचा तसेच जलाशय आणि विजेचा धक्का बसण्याचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा, असेही हवामान विभागाकडून सुचवण्यात आले आहे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठाही बंद ठेवण्याबाबतची सूचना भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. द्राक्ष आणि केळय़ांच्या पिकांना आडोसे देण्याची तसेच कोणत्याही पिकांना सिंचन किंवा रासायनिक खतांची फवारणी न करण्याची सूचना हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी