29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराष्ट्रीयअपघातवार! तीन भीषण अपघातात ६२ प्रवाशांचा मृत्यू

अपघातवार! तीन भीषण अपघातात ६२ प्रवाशांचा मृत्यू

सेनेगलमध्ये (Senegal) दोन बसगाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ४० प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला असून ८७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एका बसचा टायर फुटल्यामुळे या बसने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. राष्ट्राध्यक्ष मॅकी शॉल (Macky Sall) यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून रस्त्यावरील सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, केनियामध्ये (Keniya) झालेल्या बस अपघातात २१ जण ठार तर ४९ प्रवासी जखमी झाले आहेत. भारतातील पश्चिम बंगालमधील (West Bengal) बर्धमान जिल्ह्यात रविवारी भरधाव वेगाने जाणारी बस अचानक उलटल्यामुळे एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सोमवारचा हा दिवस अपघातवार ठरला आहे. (A collision between two buses in central Senegal; 40 people dead, 87 injured)

सेनेगलमध्ये असे अपघात वारंवार घडत असतात, परंतु मागील काही वर्षांतील हा सर्वात भीषण असा प्राणघातक अपघात ठरला आहे. कॅफ्रिनमधील मध्यवर्ती भागात झालेल्या या अपघातात सुमारे ८७ प्रवासी जखमी झाले असल्याचे आपत्कालीन सेवा अधिकारी चेख फॉल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रांत दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु असल्याचेही फॉल यांनी पूढे सांगितले. दम्यान, राष्ट्राध्यक्ष शॉल यांनी हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून यामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले असल्याचे ट्विटरवरील आपल्या शोकसंदेशात (condolence) म्हंटले आहे. “या हृदयद्रावक घटनेने मला अतिशय दुःख झाले असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. जखमी प्रवाशांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ देत,” असेही शॉल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मोदीजी, फक्त गुजरातकडेच नाही इतर राज्यांकडेही लक्ष द्या!

आता कार्यालयातही बिनधास्त झोपा!

शिवरायांचे राज्य कुटुंबाच्या नावाने नव्हते; रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य होते : शरद पवार

दरम्यान, केनियामध्ये झालेल्या बस अपघातात २१ जण ठार तर ४९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८ युगांडाच्या नागरिकांचा समावेश आहे. उगांडाची सीमा ओलांडून केनियात दाखल होताच या बसची धडक झाली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला येऊन आदळल्याची माहिती उगांडाचे प्रादेशिक पोलीस प्रवक्ते रॉजर्स तायतिका यांनी सांगितले.

प्रवाशांनी खच्चून भरलेली बस उलटून १ ठार

भारतातील पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यात रविवारी भरधाव वेगाने जाणारी बस अचानक उलटल्यामुळे एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. मनाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बसमध्ये खच्चून प्रवासी भरले होते, इतकेच नाही तर बसच्या टपावरही कित्येक प्रवासी बसले होते. रविवारी सकाळी कटवा-बिरभूम राज्य महामार्गावर हा अपघात  झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी बस चालकाला अटक करण्यात असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पूर्व बर्धमान जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी