36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराष्ट्रीयअब्दुल सत्तार यांचे निधन!

अब्दुल सत्तार यांचे निधन!

दिल्लीवर (Delhi) मनापासून प्रेम करणाऱ्या पुस्तकवेड्या (Reader) अब्दुल सत्तारांचे (Abdul Sattar) मंगळवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. मागील काही वर्षे आजारी असलेल्या ग्रंथप्रेमी सत्तारांची अखेर प्राणज्योत मालवली. इतिहासकार आणि लेखक सोहेल हाश्मी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. दिल्लीच्या इतिहासात कायम रमणाऱ्या सत्तार यांना पुस्तकांचे प्रचंड वेड होते. दिल्लीतील माहितीचा चालताबोलता “एन्सायक्लोपेडिया” अशी त्यांची ओळख होती. (Abdul Sattar passed away)

दिल्ली शहरच्या प्रेमात ते आकंठ बुडाले होते त्याच कुतूहलातून त्यांनी अधिकाधिक पुस्तकांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. दिल्ली महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनात काम केले. त्यानंतर २००४ साली ते निवृत्त झाले. दिल्ली शहर आणि त्यासंदर्भातील अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर पुस्तकांचा त्यांच्याकडे खजानाच होता. पहारी इमली येथील शहा वलिउल्लाह वाचनालयाला त्यांनी अनेक पुस्तके दान केली आहेत. उर्दू आणि पर्शिअन भाषेतील पुस्तकांचा खूप मोठा संग्रह या वाचनालयात पाहायला मिळतो, अशी माहिती लेखक सोहेल हाशमी यांनी एका वृत्तसंस्थेने दिली. जुन्या दिल्लीतील अनेक चांगल्या वाईट स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. विविध विषयांवरील पुस्तके गोळा करणे आणि त्यातील माहिती मिळवणे हा त्यांचा छंदच होता. पुस्तक लिखाणाचे कार्य त्यांनी खूप उशिरा सुरु केले. सत्तारांनी पुस्तक लिखाणास खूप उशिराने सुरुवात केली. त्याआधी चांगल्या आणि दर्जेदार पुस्तकांचा संग्रह करणे हाच त्यांचा छंद होता. दिल्ली शहर त्यांच्या नसानसांत भिनले होते.

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

अदानीविरोधातील उद्रेकापुढे अखेर सरकार नमले; वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

इतिहासकार आणि लेखक राणा सफवी यांनी सांगितले की, मिकी ज्यावेळी माझे पहिले पुस्तक लिहायला घेतले त्यावेळी त्यांनी मला खूप माहित आणि पुस्तके पुरविली. जेव्हा मी सहाजहानाबाद हे पुस्तक लिहीत होतो त्यावेळी त्यांच्याकडे पहिल्या आवृत्तीची पुस्तके होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी