20 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरराष्ट्रीयनवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

देशातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्यावतिने (DPIIT) येत्या १० ते १६ जानेवारी दरम्यान पहिल्या स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीकचे आयोजन केले आहे. (Startup India Innovation Week) भारतीय स्वातंत्र्याच्या का अमृत महोत्सवाचे स्मरण आणि देशभरात उद्यमशीलतेचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव अनुराग जैन सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी 15 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताहाला संबोधित करतील. (Startup India Innovation Week to encourage new entrepreneurs)

आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा शुभारंभ वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश आणि अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर आधारित 150 हून अधिक स्टार्टअप्सची सहा कार्यगटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्रोइंग फ्रॉम रूट्स, नडिंग द डीएनए, लोकल ते ग्लोबल, टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर, बिल्डिंग चॅम्पियन्स इन मॅन्युफॅक्चरिंग आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे कार्यगट असणार आहेत.

देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरातील स्टार्टअप नवनवीन संकल्पना राबवून सरकारला कशापद्धतीने हातभार लावू शकतात हे देखील या कार्यक्रमात समजून घेण्यात येणार आहे. तसेच या सप्ताहात राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांची देखील घोषणा करण्यात येणार आहे.
जैन म्हणाले, भारत एक इनोव्हेशन हब म्हणून उभा राहत आहे. भारत हा जगातील तीसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम आहे. सन २०२१ हे युनिकॉर्न वर्ष म्हणून ओळखले गेले. या वर्षात ४० हून अधिक युनिकॉर्न उभे राहीले. आतापर्यंत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने ६१ हजारांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

अदानीविरोधातील उद्रेकापुढे अखेर सरकार नमले; वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

जैन म्हणाले, देशातील स्टार्टअप्सनी 2016 पासून 6 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. ४५ टक्के स्टार्टअप ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांतून (टियर-२) आणि २० हजार ते ५० हजार लोकसंख्या (टियर-३) असलेल्या शहरांतील आहेत. या स्टार्टअप्सपैकी ४५ टक्के महिला उद्योजक आहेत. या स्टार्टअप आणि इनोव्हेशन फेस्टिव्हलचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, इनक्यूबेटर्स, फंडिंग संस्था, बँका, धोरणकर्ते आणि इतर राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय भागधारकांना एकत्र आणून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे असल्याचे देखील जैन यांनी यावेळी सांगितले. आठवडाभर चालणारा हा कार्यक्रम स्टार्टअप इकोसिस्टमवर चर्चा, कार्यशाळा आणि सादरीकरण अशा संकल्पनेवर असेल. तसेच उद्योजक आणि सरकारतर्फे स्टार्टअप्ससाठी देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उभे राहण्यासाठी देखील चर्चा करण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!