28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयचीनचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर पुन्हा दावा; सीमाप्रश्न पुन्हा चिघळणार

चीनचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर पुन्हा दावा; सीमाप्रश्न पुन्हा चिघळणार

चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि अकसाई चीन या भागांचा समावेश आपल्या नवीन नकाशात प्रसिद्ध करून चीनने पुन्हा भारताला डिवचले आहे. चीनने २८ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे त्याच्या नकाशाची आवृत्ती प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश राज्य आणि अक्साई चिन त्याच्या प्रदेशाचा एक भाग असल्याचा दावा केला आहे. यात अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘दक्षिण तिबेट’ म्हणून केला असून १९६२ च्या भारत-चीन युद्धात बळकावलेल्या अकसाई चीन भूभागावरदेखील हक्क सांगितला आहे. इतकेच नव्हे, तर तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राचाही नव्या नकाशात चीनच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. व्हिएतनाम, फिलीपिन्स, मलेशिया आणि ब्रुनेई हे सर्व दक्षिण चीन समुद्राच्या भागावर हक्क सांगतात.

चायना डेली वृत्तपत्रानुसार, चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने सर्वेक्षण आणि मॅपिंग पब्लिसिटी डे आणि नॅशनल मॅपिंग अवेअरनेस पब्लिसिटी वीकयांनी सोमवारी हा नकाशा जारी केला.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपली [प्रतिक्रिया दिली. “चीनने यापूर्वीही असे नकाशे प्रसिद्ध केले होते. ते प्रदेश चीनचे नसून त्यांची ही “जुनी सवय” आहे.” असे म्हणत, अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर चीनच्या सीमेतील प्रदेश म्हणून दावा करणाऱ्या चीनचा तथाकथित नकाशा त्यांनी नाकारला.

जयशंकर म्हणाले, “ही काही नवीन गोष्ट नाही. ती १९५० च्या दशकात सुरू झाली. त्यामुळे फक्त नकाशावर दावा करून काहीही साध्य होणार नाही. त्यांनी दावा केलेले प्रदेश भारताचा भाग आहेत. आमचे प्रदेश कोणते आहेत यावर आम्ही अगदी स्पष्ट आहोत. आमच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे याबद्दल हे सरकार अगदी स्पष्ट आहे. तुम्ही ते आमच्या सीमेवर पाहू शकता. मला वाटते की याबद्दल कोणतीही शंका नसावी.”
“फक्त मूर्खपणाचे दावे केल्याने इतर लोकांचे प्रदेश आपले बनत नाहीत,” जयशंकर म्हणाले.

यावर, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते, अरिंदम बागची म्हणाले: “चीनने असे काही करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अरुणाचल प्रदेशातील क्षेत्रांची नावे बदलण्याचे आणि अशा कोणत्याही प्रयत्नांचा आम्ही आधीच निषेध करतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भूभागांवर अशी नवी नावे लादल्याने वास्तव बदलणार नाही.”

हे ही वाचा 

इंडियाच्या बैठकीतून शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न

मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन धरणग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची महिलांसाठी भेट; गॅस सिलिंडरच्या दरात घट

चीनच्या या कृत्यावर कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या चिनविषयक भूमिका जबाबदार असल्यावहे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, “चीनने आपली जमीन हडपली हे संपूर्ण लडाखला माहिती आहे. लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले, ते खोटं आहे, हे मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे. चीनने अतिक्रमण केलं आहे आणि हे संपूर्ण लडाखला माहीत आहे. नकाशाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनी जमीन हिसकावून घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काही तरी बोलायला हवं” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी