31 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजीद मेमन तृणमूल काँग्रेसमध्ये

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले माजीद मेमन तृणमूल काँग्रेसमध्ये

विख्यात कायदेतज्ञ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांनी आज नवी दिल्लीत तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डेरेक ओ ब्रायन व सौगता रॉय यावेळी उपस्थित होते.

विख्यात कायदेतज्ञ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांनी आज नवी दिल्लीत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डेरेक ओ ब्रायन व सौगता रॉय यावेळी उपस्थित होते. मेमन 2014 ते 2020 या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. संसदेच्या विविध महत्त्वपूर्ण संसदीय समित्यांवर काम केले आहे. मेमन यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर माजीद मेमन कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मेमन यांना कायदे क्षेत्रातला तब्बल 49 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक मोठे खटले त्यांनी चालवले असून विविध प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तीवाद केला आहे. देशातील विविध उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, तसेच विदेशातील अनेक न्यायालयांमध्ये मेमन यांनी युक्तीवाद केला आहे.

24 नोव्हेंबर रोजी त्यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. “मला 16 वर्ष सन्मान दिला आणि मार्गदर्शन केलं, यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आभारी आहे. मी वैयक्तिक कारणामुळे पक्ष सोडतोय. पवार साहेबांना आणि पक्षाला शुभेच्छा”, असे ट्विट त्यांनी त्यावेळी केले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.

हे सुद्धा वाचा

नवाब मलिकांच्या तात्काळ जामीन सुनावणीला न्यायालयाचा नकार, जाणून घ्या कारण

जगात सर्वात जास्त अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात ?, जाणून घ्या एका क्लिकवर

सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव रिद्धी डोगराने केला शेअर

दरम्यान, मेमन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. आज त्यांनी दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यांना तृणमुलमध्ये आता कोणत्या पदावर स्थान देण्यात येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत त्यांना पद न दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मेनन यांच्या समर्थकांमध्ये सुरू होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी