29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईमुंबईकरांनो उद्या बाहेर पडणार असणार तर सावधान! 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक

मुंबईकरांनो उद्या बाहेर पडणार असणार तर सावधान! ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

मुंबई रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई लोकलचा दर रविवारी मेगाब्लॉक असतो. 4 जून लाही मुंबई रेल्वेने मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. दरम्यान आज रात्रीपासून जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या कामासाठी आज रात्री 12 पासून रविवारी दुपारी 2 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द केल्या असून लोकलच्या वेळापत्रकात बद्दल केले आहेत. चर्चगेट-बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत.

 

हे सुध्दा वाचा :

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी…महिन्याचा 79,000 इतका पगार

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक गंभीर जखमी

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

लोकलचं वेळापत्रक काय आहे?

१. ब्लॉकच्या वेळेस वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा उपलब्ध नसणार.

२. सीएएसएमटी- गोरेगावला जाणारी लोकल दुपारी 1.52 ची लोकल रद्द केली आहे.

3. चर्चगेटवरून दुपारी 12.16 वाजता सुटणारी लोकल चर्चगेट-बोरिवली आणि दुपारी 2.50 वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल.

4.ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील.

त्यामुळे मुंबईकरांनी या वेळापत्रकानुसारच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी