28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeव्हिडीओVIDEO : पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार

VIDEO : पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार

पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार

पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची घोषणागेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी आज लक्षवेधी लावली. त्यावर चर्चा करताना पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी लवकरच योजना जाहीर करण्यात येणार आहे. सध्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ९६ हजार ७७७ बांधकामांना शास्तीकर माफीचा दिलासा मिळणार आहे. यामध्ये राहणारे सुमारे ४ लाख ५० हजार नागरिक आणि व्यापारी, व्यावसायिक यांच्यासह लघु उद्योजकांना शास्तीकरातून सुटका झाली असून, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी