29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeनिवडणूकVidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले

VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकार’चे काम चांगले आहे की, वाईट याविषयी जनमाणसांमध्ये मतांतरे आहेत. पण आपले सरकार काम करीत नाही, असा ढिंडोरा खुद्द सत्ताधारी आमदारानेच केला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व आमदारांचे मूल्य वाढले आहे. ही संधी साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्याच सरकार दुगाण्या झाडल्या आहेत.

‘माझ्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. सरकारकडे कामे घेऊन गेल्यानंतर सरकार काम करीत नाही’ अशी जाहीर नाराजी मोहिते यांनी प्रसारमाध्यमांजवळ व्यक्त केली आहे. जोपर्यंत अजितदादा मला शब्द देत नाहीत. तोपर्यंत मी मतदान करणारच नाही, अशा इरेला मोहिते पेटले होते. अखेर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी रदबदली केली. त्यांनी स्वतः पुढाकार घेवून मोहिते यांना त्या अजितदादांकडे घेऊन गेल्या. त्यानंतर मोहिते यांची नाराजी दूर करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :

VidhanParishad Election 2022 : ‘महाविकास आघाडी सरकार’ अचंबित निर्णय घेते, म्हणून आमचा उमेदवार निवडून येणार’

विधानपरिषदेवर चालणार कोणाची जादू ?

धनंजय मुंडेंना कौतुक वंचितांच्या मुलांच्या कामगिरीचे !

बांठीया आयोगामधील त्रुटी दूर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आश्वासन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी