33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईसाडेचार वर्षाच्या आयुषकडून उध्दव ठाकरेंना अनोखी सलामी

साडेचार वर्षाच्या आयुषकडून उध्दव ठाकरेंना अनोखी सलामी

टीम लय भारी

मुंबई :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. परंतु मुख्यमंत्री त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत अशी घोषणा त्यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड प्रमाणत जिवीतहानी झाली आहे. कोरोना महामारीचे संकट ही आहे. परंतु साडेचार वर्षाच्या आयुषने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अनोख्या पध्दतीने सलामी दिली (Chief Minister Uddhav Thackeray was saluted in a unique manner).

भांडुप हनुमान टेकडी येथील साडे चार वर्षाचा मोझ्यक पोर्ट्रेट तयार करणारा बाल कलाकार आयुष कांबळे यांने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अनोखी पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ४५०० कागदी फुलांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ४ फुट उंच आणि ३ फुट लांबीचे मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे. अवघ्या साडे चार वर्षात आयुष कांबळे यांने या क्षेत्रात विश्वविक्रम केला आहे.

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…

पवईतील तरुण मोझ्यक पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी अनेक विश्वविक्रम करून आपले नाव वर्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद केली आहे. आयुष देखील चेतन यांना काही पोर्ट्रेट मध्ये मदत करत असतो. त्यामुळे बाल वयातच याची आवड निर्माण होताच लहान वयात आयुषने मोठी भरारी घेतली आहे. आयुष हा चेतन राऊत यांचा भाचा असुन मामा आणि भाचा उच्च शिखर गाठणार हे मात्र नक्की (AYUSH is Chetan Raut’s nephew and Mama and nephew are sure to reach the top).

Uddhav Thackeray was saluted in a unique manner
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात राज्यसरकार बांधणार संरक्षक भिंत

Restore Electricity, Water Supply In Flood-Hit Areas: Maharashtra Chief Minister

काही मोझ्यक पोर्ट्रेट मी माझ्या मामा सोबत तयार केली आहेत. त्यामुळे मला याची आवड निर्माण झाली म्हणून माझे मामा चेतन राऊत यांच्याकडून याचे थोडेफार मार्गदर्शन घेत मी हे पोर्ट्रेट तयार केले आहे. हा विश्वविक्रम करण्यात मी एकटाच नसुन त्यात माझ्या इतकीच चेतन राऊत (मामा) यांची देखील मेहनत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी