28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईलोकल प्रवासासाठी आता अधिकारप‌‌त्र बंधनकारक

लोकल प्रवासासाठी आता अधिकारप‌‌त्र बंधनकारक

टीम लयभारी

मुंबई :- कोरोना हळूहळू कमी होत असताना आता डेल्टा प्लस या वेरियंटमुळे राज्यात अधिक धोका वाढला आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने नवीन निर्बंध लावले आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरू व्हावी अशी मुंबईकरांची अशा होती. परंतु त्यांची ही आशा आशाच राहिली. आता नवीन नियमानुसार ज्यांच्याकडे लोकल प्रवासाचे अधिकारपत्र असेल त्यांनाच प्रवासाची मुभा मिळणार आहे (Authorization is now mandatory for local travel).

हे अधिकारपत्र फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच मिळणार आहे. काही सामान्य लोक हे विनातिकीट प्रवास करतात, तर काही बनावट पास तयार करून प्रवास करतात. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता अधिकारपत्र असेलेल्यानाच तिकीट किंवा पास मिळणार असे सांगितले. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकर हे नाराज दिसत आहेत. सर्वसामान्यांना हि प्रवासाची मुभा द्यावी अशी त्यांची मागणी आहे.

ठाकरे सरकार तुमची घर वसुली वर चालतात पण… मनसेचा आक्रोश

कोरोना मेला, जनता बेफिकीर, पुढारी मोकाट

Authorization is now mandatory for local trave
मुंबई लोकल प्रवास

कसे मिळणार लोकल प्रवासासाठी अधिकारपत्र

अत्यावश्यक सेवा देत असलेल्या आस्थापनेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास या पोर्टलवर जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे. त्या पोर्टलवर आस्थापनेला आस्थापनेचे नाव, पत्ता आणि कुठल्या प्रकारची आस्थापना आहे ते सांगावे लागणार आहे. त्याचबरोबर समन्वयकाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागणार. त्यानंतर आस्थापनेचे प्रमुख हे वरील माहितीला परवानगी देतील. या नंतर आस्थापनेच्या समन्वयकाला कर्मचाऱ्यांची माहिती त्या पोर्टलवर भरावी लागणार.

‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय

Two jabs protect, shows survey of Covid-hit in Mumbai

या नंतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या मोबाईलवर एसएमएस येईल. त्या एसएमएस वर आलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर कर्मचाऱ्याने स्वतःचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन झाल्यावर आपला फोटो अपलोड करावा. हे सर्व झाल्यावर कर्मचाऱ्याचा ई-पास हा तयार होईल, मग त्याची प्रिंट काढायची आहे (The employee’s e-pass will be generated, then it will be printed).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी