28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईठाकरे सरकार तुमची घर वसुली वर चालतात पण... मनसेचा आक्रोश

ठाकरे सरकार तुमची घर वसुली वर चालतात पण… मनसेचा आक्रोश

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे सामन्या जनतेचे हाल होऊ लागले आहेत. तुमचे घर वसुलीने चालतात पण सामान्य जनतेला नोकरी उद्योग धंदे करून घर चालवाव लागत. अशी घणाघात टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे (MNS leader Sandeep Deshpande has sharply criticized).

काल सोशल मीडियावर एका तरुणाने एक व्हिडिओ शेर केला होता. हाच व्हिडिओ संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर पोस्ट केला आहे. यानंतर ते म्हणाले की, तुमची घरं वसुली वर चालतात पण सामान्य जनतेला नौकरी उद्योग धंदे करून घर चालवाव  लागत. महावसुली सरकार सामान्य जनतेच्या विचार कधी करणार? हे सरकार महावसुली सरकार आहे. अशी घणाघात टीका त्यांनी केली आहे (This government is a revenue recovery government. He has made such harsh criticism).

आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल… पवारांनी लगावला टोला

मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही, कोण आणि का म्हणाले…

एका तरुणाने काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (This video has gone viral on social media). या व्हिडिओमध्ये तो तरुण म्हणतोय, परळ स्टेशन वर तिकीट नसल्यामुळे टीसीने मला पकडले आहे. दीड वर्ष मी घरी होतो नुकतीच मला नोकरी लागली आहे. आज माझ्या कामाचा दुसरा दिवस आहे. हे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. मात्र, या झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार आहे. सामान्य माणूस रोज कमवणार तर रोज खाणार. असे रोज दंड भरणार तर आम्ही खाणार काय? असा प्रश्न या तरुणाने केला आहे.

MNS leader Sandeep Deshpande has sharply criticized
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे

उद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना शिवबंधन बांधूया

True Leader Knows When To Protest: Uddhav Thackeray On BJP’s Quota Stir

आम्हाला तिकीट दिली जात नाही, कारण की आम्ही सरकारी अधिकारी नाहीत. आम्ही सरकारी अधिकारी नाही म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?  माझ्या बँक खात्यात आज फक्त 400 रुपये आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गेली, दीड वर्ष घरी असल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. दीड वर्ष घरी असलो तरी आमच्या मनात आत्महत्तेच विचार येत नाही. असेच चालू राहिले तर आमच्या सारख्या गरीब मुलांनी करायचे काय?  असा प्रश्न या तरुणाने केला आहे (What do poor kids like us do? This is the question this young man has asked).

या व्हिडिओ मध्ये हा तरुण आणखी खूप बोललेला आहे. आज वस्तुस्थिती हीच आहे. या तरुणाची जी अवस्था आहे तशीच अवस्था राज्यात अनेक तरुणांची आहे. सरकारी अधिकारी असेल तर ट्रेन प्रवास करू शकतो. पण इतर लोकांनी नोकरीवर जायचे कसे?  हे सरकार सामान्य जनेतचा विचार कधी करणार, या सरकारला जाग कधी येणार आहे (When will this government think of the common people, when will this government wake up?).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी