31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींची जनगणना करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

ओबीसींची जनगणना करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी

टीम लय भारी

जालना : ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी आज (रविवार) जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समजाच्या हक्कांसाठी लोकभेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून, ओबीसींची जनगणना आवश्यक असल्याची मागणी केल्याचे दिसून आले.

“आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा…, ओबीसींची जनगणनेची आवश्यकता आणि अनिवार्यता आहे. काही आठवणी आणि काही वचने..” असं पंकजा मुंडेंनी ट्विट केलं आहे. तसेच, “२०२१ ची जनगणना जातिनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावांमधून निघालेला आवाज राजधानीपर्यंत नक्कीच पोहचणार, याबद्दल काहीच शंका नाही.” असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी