30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयपरमबीर सिंह भारतातच असून फरार नाहीत, मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका

परमबीर सिंह भारतातच असून फरार नाहीत, मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका

टीम लय भारी

मुंबई: मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते(Parambir Singh is still in India and is not absconding)

आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे.

संतापजनक : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी RTI कायद्याचा केला पाचापाचोळा

मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता.

विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

Bank Recruitment 2021: सेंट्रल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांवर भरती!

Parambir Singh is very much in the country, ready to appear before CBI: Former Mumbai top cop’s advocate to SC

“परमबीर सिंहांवर बिल्डरकडून ९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप”

गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंह यांना नोटीस बजावण्यात आली होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी