32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeसंपादकीयहर्षवर्धन पाटील : ‘भाजप’चा कोप झालेला नेता

हर्षवर्धन पाटील : ‘भाजप’चा कोप झालेला नेता

टीम लय भारी

मुंबई : राजकारणामध्ये प्रत्येक नेता हा महत्वकांक्षी व संधीसाधू असतोच. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा संधीसाधूंची यादी केली तर, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचा वरचा क्रमांक लागेल (Politics every leader is ambitious and opportunistic).

राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल आपण नंतर बोलूयात. आज चर्चा करूयात हर्षवर्धन पाटील यांची. कमी वयातच हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपद मिळाले. सत्ता कोणाचीही असो, हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपद निश्चित असायचेच. पण २०१४ नंतर त्यांचे मंत्रीपद गेले. आमदारकीही नाही, आणि मंत्रीपद सुद्धा नाही, अशी केविलवाणी अवस्था पाटील यांची झाली. त्या अगोदर तब्बल २० वर्षे त्यांनी मंत्रीपदाची खिरापत ओरपली.

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येने हातात झाडू घेऊन साफसफाई केली, अन् तिथे कोविड सेंटर उभारले

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

सन १९९५ मध्ये राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार होते. त्यावेळी हर्षवर्धन पाटील अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. तरीही त्यांना त्यावेळी मंत्रीपद मिळाले. त्यानंतर पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सन १९९९ मध्ये शिवसेना – भाजप युतीची सत्ता गेली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आले. हर्षवर्धन पाटील यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी सोडली नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तब्बल १५ वर्षे, म्हणजे सन २०१४ पर्यंत राज्यात आघाडीची सत्ता होती. हर्षवर्धन पाटील यांना सहकार, महिला व बाल विकास अशी मोठी मंत्रीपदे मिळाली. काँग्रेसचे निष्ठावंत नेते अशी ओळखही त्यांनी निर्माण केली (He also created a reputation as a loyal leader of the Congress).

पण दुसऱ्या बाजूला सलग २० वर्षे मंत्रीपदावर राहिल्यामुळे जनतेशीही बऱ्यापैकी नाळ तुटली होती. दत्तात्रय भरणे नावाचा साधा तरूण तोपर्यंत डोके वर काढत होता. इंदापूरच्या सामान्य जनतेला त्यांची काही समस्या सांगायची असेल तर हर्षवर्धन पाटील सहजासहजी उपलब्ध व्हायचे नाहीत. ते मंत्रीपदाच्या मिजाशीमध्ये मश्गूल होते. अशा वेळी सामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून यायचे दत्तात्रय भरणे (Filling the Dattatraya to come to the aid of the common people).

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

Times Most Influential Personalities 2021- 2

हळहळू दत्तात्रय भरणे यांची जनतेसोबतची नाळ घट्ट होत गेली, तर हर्षवर्धन पाटील जनतेपासून दुरावत गेले.

अजित पवार हे सरकारमधील मातब्बर व्यक्तीमत्व होते. तेव्हाच्या सरकारमधील अनेकांशी त्यांचे जमत नव्हते. यात विजयसिंह मोहिते – पाटील, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता. हर्षवर्धन पाटील यांना धडा शिकविण्यासाठी अजित पवार टपून बसलेले होते. त्यासाठी त्यांनी दत्तात्रय भरणे यांना ‘तयार’ केले. दत्तात्रय भरणे हे मुळातच जमिनीवर पाय ठेवलेला व तोंडात साखर असलेला नेता. त्यामुळे अजित पवारांनी दाखविलेला विश्वास भरणे यांनी सार्थ ठरविला.

सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. इंदापूर मतदारसंघात काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. हर्षवर्धन पाटील हे मातब्बर नेते. या उलट दत्तात्रय भरणे सामान्य कुटुंबातील बहुजन वर्गातील साधा माणूस. पण भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना धोबीपछाड दिली. पाटील यांचा पराभव झाला.

पराभवामुळे पाटील यांची मोठीच पंचाईत झाली. पहिल्यांदाच सत्तेपासून दूर जावे लागले. सत्ता असली की, सरकारी पैशातून नोकर – चाकर, गाडी, बंगला अशी मौज करता येते. करोडपती उद्योजकही हात जोडून भेटायला येतात. जे हवं ते आपोआप मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही २० वर्षे अशी मौज करण्याची चटक लागली होती. आता मंत्रीपद तर सोडाच, साधी आमदारकीही उरली नव्हती.

Politics every leader is ambitious and opportunistic
दत्तात्रय भरणे सामान्य कुटुंबातील साधा माणूस पण भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना धोबीपछाड दिली

त्यावेळी म्हणजे, सन २०१४ मध्ये भाजपचे वारे वाहू लागले होते. पण आमदारकीही नसल्याने हर्षवर्धन पाटील यांना किंमत उरलेली नव्हती. सत्तेची किंमत वसूल करायची तर जवळ किमान आमदारकी तरी असायला हवी. पाटील यांच्याकडे ती सुद्धा उरली नव्हती.

अशातच २०१९ च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीविरोधात त्यांनी तोंडपाटीलकी सुरू केली. सुप्रिया सुळेंसारख्या वरिष्ठ नेत्याने पाटील यांची भेट घेतली. इंदापूरमधून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीचे तिकीट हर्षवर्धन पाटील यांनाच मिळेल. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण साथ देईल, अशा शब्द सुप्रिया सुळे यांनी दिला.

पण काँग्रेस – राष्ट्रवादीचे दिवस संपलेत. आता भाजपशिवाय पर्याय नाही, अशी भावना हर्षवर्धन पाटील यांची झाली असावी. पाटील यांच्यातील संधीसाधू स्वभाव जागृत झाला. मंत्रीपदाचा चमचा पुन्हा तोंडात घ्यायचा असेल तर भाजपमध्ये जायलाच हवे, अशी त्यांची भावना झाली असावी. तिकीटवाटप होण्याच्या अगोदरच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला (Harshvardhan Patil joined the BJP even before the distribution of tickets).

काँग्रेसचा निष्ठावंत असे स्वतःला म्हणवून घेणारा नेता सत्तेसाठी लाचार झाला. त्यांनी भाजप प्रवेश केला. पण भाजपप्रवेश त्यांना काही पावला नाही. दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. भाजपही सत्तेत आला नाही.

पाटील यांनी काँग्रेससोबत निष्ठा जपल्या असत्या, तर इंदापूरमध्ये निवडूनही आले असते, आणि सध्याच्या मंत्रीमंडळात मोठे पदही मिळविले असते. पण ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच. त्यांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिली, अन् त्यांच्यावर भाजप कोपला. ‘न घर का, ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. काँग्रेससोबतचे संबंध तुटलेत. भाजपमध्ये कुणी विचारत नाही. मतदारांचेही प्रेम दत्तात्रय भरणे यांच्यावरच अधिक. त्यामुळे हर्षवधर्न पाटील यांना गतवैभव प्राप्त करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी