30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयदिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

टीम लय भारी

मुंबई: कुकडी पाटबंधारे विभागाच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी जलसंपदा विभागाकडून 31 कोटींच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या सर्व दुरुस्तीकामांना वेग येणार आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या निधीच्या तरतुदीबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आभार मानले आहेत (Dilip Walse Patil has thanked Jayant Patil).

जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी कुकडी पाटबंधारे विभागाच्या दुरुस्तीकामांना तातडीने मंजुरी मिळावी आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी कालवा सल्लागार बैठक घेण्यात आली होती. यानंतर जलसंपदा विभागाकडून 31 कोटींच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. एकूणच या निधीमुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती कामांना वेग येणार असून नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. तसेच राज्यभरातील जलसिंचन प्रकल्पांना चालना देऊन जलव्यवस्थापनासाठी जलसिंचन विभाग प्रयत्नशील होणार आहेत.असे दिलीप वळसे पाटील म्हणाले (Dilip Walse Patil said, this is a matter of consolation for the citizens).

शरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

WorkFromHome : दिलीप वळसे – पाटलांचे मतदारसंघात लक्ष; रस्त्यांसाठी १० कोटी मंजूर करून घेतले

डिंभे डाव्या कालव्याच्या 55 किमी अंतरामधील गळती रोखण्यासाठी बांधकाम दुरुस्ती, अस्तरीकरण, भराव यासाठी 27 कोटी 22 लक्ष, डिंभे उजवा कालवा अस्तरीकरण, गेट दुरुस्तीसाठी 90.78 लक्ष, मिना शाखा व पूरक कालवा बांधकाम दुरुस्ती व गळती प्रतीबंधक कामासाठी 64.72 लक्ष अशी तरतूद शासनाने केली आहे.

Dilip Walse Patil has thanked Jayant Patil
दिलीप वळसे पाटील

घोड नदीवरील सूलतानपूर, पिंपळगाव-खडकी, काठापूर, सरदवाडी याठिकाणच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे दुरुस्तीसाठी 197.06 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंचर शहर नळ पाणीपुरवठा योजना, सुलतानपूर ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून कार्यान्वित केली आहे.

Dilip Walse Patil has thanked Jayant Patil
जयंत पाटील

राज्यातील पहिला सरकारी घोटाळा बाहेर काढणाऱ्या संपादकांचे निधन

Maharashtra home minister Dilip Walse Patil orders probe into DCP’s audio clip

मंचर शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी या बंधाऱ्याच्या दुरुस्ती साठी 68 लाख 68 हजार, पिंपळगाव खडकीसाठी 14.34 लक्ष, काठापूरसाठी 33.34 लक्ष तर सरदवाडीसाठी 29.85 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मिना नदीवरील वळती-नागापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पाणीगळती रोखण्यासाठी 10.40 लक्ष, कुकडी नदीवरील आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील म्हसे बंधाऱ्यासाठी 8.46 लक्ष, भाकरेवाडी, बाबरमळा, वडनेर येथील पिअर दुरुस्ती आणि गळती प्रतिबंधक कामासाठी 11.89 लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी