30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeसिनेमारजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

रजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

टीम लय भारी

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट म्हणले की चाहते अक्षरशः धिंगाणा घालतात. दक्षिणात्य भागात तर त्यांना देवाचे स्थान दिले आहे. त्यांच्या चित्रपटाच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घालणे, आरती करणे हे सारे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु या वेळी तर या अतिउत्साही चाहत्यांनी रजनीकांतबद्दलचे प्रेम दाखवण्यासाठी भयंकर क्रुर मार्गाचा अवलंब केला. यंदा दुधाने नाही तर चक्क बकरीच्या रक्ताने पोस्टरचा अभिषेक करण्यात आला आहे (Rajinikanth fans, blood sprinkled on posters).

TMKOC : बबिता नंतर आता टप्पूनेही त्यांच्या रीलेशनशिपची अफवा पसरवणाऱ्यांना दिले खरमरीत उत्तर

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

नक्की काय घडले?

रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘अन्नाथे’च्या पोस्टरचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला. चेन्नईमधील त्यांच्या चाहत्यांनी आनंद साजरा करण्यासाठी अत्यंत क्रुर कृत्य केले आहे. या चाहत्यांनी रजनीकांतच्या पोस्टरला हार घालून एका जिवंत बकरीला फरफटत आणण्यात आले. एका माणसाने या बकरीच्या गळ्याला रश्शीने घट्ट पकडून, दुसऱ्याने रजनीकांतच्या नावाचा जयघोष करत तलवारीच्या सहाय्याने एका फटक्यात बकरीचे मुंडके उडवले. इतक्यावर ते थांबले नाही, तर ती बकरी तडफडायला लागल्यानंतर एकाने तिला उचलून त्या बकरीचे रक्त पोस्टरवर शिंपडले आणि मग बकरीला खाली टाकून दिले. यावेळी चाहत्यांनी रजनीकांत नावाचा जयघोष केला आणि काही क्षणांतच त्या बकरीने प्राण सोडले (Rajinikanth upcoming film ‘Annathe’ first look of the poster of been launched).

Rajinikanth fans, blood sprinkled on posters
बकरीला फरफटत आणून तिचे शीर उडवून तिचे रक्त पोस्टरवर शिंपडले

ह्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल होत आहे. तसेच या क्रुर कृत्याची सर्वच स्तरातून निंदा केली जात आहे. अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरमचे प्रशासक आणि रजनीकांत यांच्या जवळचे मानले जाणारे वी एम सुधाकर यांनी या घटनेची कठोर निंदा करत दुःख व्यक्त केले आहे. ”हे कृत्य घोर निंदणीय आणि दुःखदायक आहे, कुणीही अशा हिंसक कृत्यात सामील होऊ नये.” या कृत्याचा निषेध करत ते म्हणाले.

वाढदिवस विशेष : सुप्रिया – सचिन पिळगांवकर यांची सदाबहार प्रेमकहाणी

Jayalalithaa’s well wisher Rajnikanth is all praises for Kangana Ranaut’s Thalaivii; here’s what he said

Rajinikanth fans, blood sprinkled on posters
रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘अन्नाथे’च्या पोस्टरचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला

रजनीकांतचा अन्नाथे हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सिवा यांनी केले आहे. कलानिथी मारन हे या चित्रपटाचे लेखक आहेत. चित्रपटाचे संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते विनर डी. इमान यांनी तयार केलं आहे. विशेष बाब म्हणजे दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रमण्यम ने यांनी निधनापुर्वी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. मीना, खुशबू, जगपति बाबू, प्रकाश राज यांसारखे स्टार्स लीड रोल मध्ये असणार आहेत (Rajinikanth Annathe will be released on November 4, 2021).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी