35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने आतातरी गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना वेसण घालावी : रोहित पवार

भाजपने आतातरी गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना वेसण घालावी : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेटमध्ये मोहम्मद पैंगबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. तसेच काही देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे ट्विटर ट्रेंडही सुरु करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता अरबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. rohit pawar on bjp government

रोहित पवार (rohit pawar) म्हणतात की, राजकीय विरोधक असले तरी Narendra Modi  साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या च्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय.हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे.

विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत.. किंबहुना त्यांच्या या ‘लाय…’मुळंच महाराष्ट्र भाजप ने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी असा सल्ला रोहित यांनी दिला आहे.

काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये मोदींचे पोस्टर कचराकुंडीवर लावण्यात आले आहेत. तसंच, या ट्वीटमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री ए. जयशंकर यांनाही टॅग केलं आहे.

हे सुद्धा वाचा : 

उत्सवी राजा तळमळे प्रज्ञा :  संजय  राऊत

Nupur Sharma’s statement on Prophet Muhammad: ‘Those who express bigotry at home should be…’, Shashi Tharoor slams BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी