27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रविठ्ठला मुख्यमंत्र्यांनी जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट घेउदे...

विठ्ठला मुख्यमंत्र्यांनी जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना

टीम लय भारी

मुंबई:- पावसाने काल थैमान घातला होता. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत वारीला गेले. आज मुख्यमंत्री पंढरपूरहुन, मुंबईकडे येण्यास रवाना झाले आहेत. विठ्ठला जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अशी बोचरी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे (MNS Sandeep Deshpande has made such a scathing remark against Chief Minister Uddhav Thackeray).

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरहुन, मुंबईकडे येण्यास रवाना झाले आहेत. यावरून संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग. पांडुरंग… असे ट्विट करत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

लोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोना संदर्भात बैठक

मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठल-रखुमाईची महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई केशव कोलते यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत (Keshav Kolte has been serving as a weaver in the Vitthal Rukmini Temple for 20 years).

Sandeep Deshpande scathing against CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री सहपत्निक झाले पंढरपूरला रवाना…

On ‘Ashadhi Ekadashi’, Uddhav Thackeray Prays For End Of COVID-19 Crisis

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपुराला गेले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी काल दुपारी पंढरपूरला रवाना झाले. काल रात्री 9 च्या सुमारास ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले होते. यावेळी ते स्वत: गाडी चालवत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी