29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयउद्धव सेनेचे ५६ आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले :...

उद्धव सेनेचे ५६ आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांवर खरमरीत टीका केली आहे. उद्धव सेनेचे ५६ आमदार हे हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या भाजप-शिवसेना युतीच्या जीवावर निवडूण आले आहेत. हे संजय राऊत विसरले असतील असे म्हणत पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे (Gopichand Padalkar once again slammed Shiv Sena MP Sanjay Raut).

त्याचबरोबर ओवीसीची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून तुम्ही केली आहे. पण याच ओवीसीला मीठी मारून मालेगावच्या सत्तेसाठी ईदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता. तसेच, अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली होती. ‘जनाब राऊत एमआयएम (MIM) की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्रातील जनतेला सांगायची आवश्यकता नाही. असे म्हणत पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील हिंदूंना शिव्या देणाऱ्या शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता हे दररोजचें मनोरंजन बंद करा. महाराष्ट्रातील जनतेला या खेळाचा किळस आला आहे, असे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा

No Need To Open Cinema Halls, BJP Entertaining People: Sena’s Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी