मुंबई

संजय राऊतांकडून ‘किरीट का कमाल’ म्हणत सोमय्यांवर गंभीर आरोप

किरीट का कमाल' म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मागील काही दिवसांपासून खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून किरीट सोमय्यांवर आरोप करतात. राऊतांनी आज देखील NSEL घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांवर आरोप केले आहेत. याप्रकरणी सोमय्यांनी ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानतंर मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी झाली.

टीम लय भारी

संजय राऊतांकडून 'किरीट का कमाल' म्हणत सोमय्यांवर गंभीर आरोप

मुंबई : किरीट का कमाल’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मागील काही दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून किरीट सोमय्यांवर आरोप करतात. राऊतांनी आज देखील NSEL घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांवर आरोप केले आहेत. याप्रकरणी सोमय्यांनी ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानतंर मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी झाली.

स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तिथे जाऊन तमाशा केला. सोमय्यांनी गेल्या २०१८ ते २०१९ मध्ये मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेसाठी घेतले, असे गंभीर आरोप राऊतांनी केले आहेत.

संजय राऊत यांनी सोमय्यांवर मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी आरोप केले होते. कोलकातामधील मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र, या मेट्रो डेअरीने सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी (Sanjay Raut) केला होता.

 

हे सुद्धा वाचा: 

‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खुलं आवहान

BJP’s Kirit Somaiya Extorted Crores, Sena’s Sanjay Raut Alleges

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close