33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

टीम लय भारी

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar ) यांचं आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल त्याची प्रकृती खालावली असता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. (Sanjeevani Karandikar dies in Pune)

वयाच्या ८४ वर्षी त्यांचे निधन झाले. आज सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने ठाकरे आणि करंदीकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संजीवनी करंदीकर म्हणजे (Sanjeevani Karandikar ) आमच्या आत्या. त्यांना समृद्ध वारसा लाभला आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने आमचा शेवटचा दुवाही निखळला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन (Sanjeevani Karandikar )अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं.

हे सुध्दा वाचा :- 

Shiv Sena Delegation Visits Lilavati Hospital Over Rana’s MRI Pictures; BMC Issues Notice

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी