36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीय‘वर्षां‘नी दार उघडले; आता ‘बडव्यांचे‘ काय?

‘वर्षां‘नी दार उघडले; आता ‘बडव्यांचे‘ काय?

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहीले आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना आमची भेटायची इच्छा असून,देखील आम्हाला भेटून दिले जात नव्हते. जसे पंढरपूला पांडूरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी बडव्यांचा सामना करावा लागत होता. तिच परिस्थिती शिवसैनिकांची झाल्याची खंत या पत्रातून व्यक्त केली आहे.

काल वर्षा बंगल्याची दारं सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी बघून आम्हाला आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्षे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला विधानसभा आणि राज्यसभेत निवडून गेलेल्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती. बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल महाराष्टाने पाहिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना वर्षा बंगल्यात आम्हाला कधीच थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळयावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात. पण आमच्यासाठी तर सहाव्या माळयाचाही प्रश्न आला नाही कारण मुख्यमंत्री मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तीक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला.बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार मतदारांमधून निवडून आलेल्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का, हा आमचा सवाल आहे?
आशा प्रकारे एकनाथ शिंदेसह सर्वच बंडखोर नाराजांचे मत या पत्रातून व्यक्त करण्यात आले आहे.
वर्षां म्हणजे पंढरपूर, पक्ष प्रमुख हे पांडुरंग मग बडवे कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्व जनतेला माहित आहे. विनाकारण जास्त बडबड करणारे बडवे शिवसेनेला भगदाड पाडण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा सगळीकडे आहेत. जसे पंढरपूरच्या पांडूरंगाला काही वर्षांपूर्वी बडव्यांनी घेरले होते. बंडवे पांडूरंगाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना लुटत होते. तिच स्थिती शिवसेनेत आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसेना ‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्यास तयार, पण बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे : संजय राऊत

आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे

राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी