31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिंदे गटात सामील

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिंदे गटात सामील

टीम लय भारी

शहापूर: शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिंदे गटात सामील झाले आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये होते. त्यांनी जूलै 2019 मध्ये शिवबंधन बांधले. पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे चार वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. शहापूर तालुक्यात त्यांनी विकास कामे केली. त्यामुळे परिसरात त्यांचा दबदबा आहे.

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ भावली योजना‘ 285 गावांची पाणी योजना होती. एकनाथ शिंदेंनी सातत्याने प्रयत्न करुन मंजूर केला. त्यामुळेच आमदार पांडुरंग बरोरा हे शिंदे गटात सामील झाले आहेत.पांडुरंग बरोरा यांनी मतदार संघात विकास कामे केली आहेत. त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे.

तसेच शहापूर तालुक्यात शिंदे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. शहापूर तालुक्यातील अनेक शिवसेनेच्या कार्यकत्र्यांचा एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा आहे. बरोरा यांनी हा निर्णय घेतला. यावेळी आकाश सावंत, अनिल घोडविंदे, शिवतेज सावंत, जयराम वारघडे, अदिवासी समाजाचे युवा नेते धीरज झुरे, सुभाष मोडक आदी कार्यकत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शविला.

शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेचाच एक भाग असलेला मोठा गट शिंदे गट बनला आहे. त्यामुळे अनेक नेते शिंदे गटाकडे आकर्षित झाले आहेत. त्यात माजी आमदारांचा देखील सहभाग आहे. ज्याची सत्ता आहे तोच आपले काम करु शकेल. ही भावना प्रत्येकाच्या मनात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विकास कामांवर अनेकांना विश्वास आहे. ज्यावेळी बरोरा 2019 मध्ये शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे हजर होते.

हे देखील वाचा:

अमरनाथ यात्रेत दोन जणांचा मृत्यू

राज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला – प्रवीण दरेकर

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी