31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रीडाAustralia New Captain : अखेर ऑस्ट्रेलियाला नवा वनडे कर्णधार मिळाला! वॉर्नर नव्हे...

Australia New Captain : अखेर ऑस्ट्रेलियाला नवा वनडे कर्णधार मिळाला! वॉर्नर नव्हे तर ‘या’ खेळाडूला मिळाली जबाबदारी

एकदिवसीय क्रिकेटमधून ऍरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वनडे संघाची कमान आपला नंबर वन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपवली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधून ऍरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वनडे संघाची कमान आपला नंबर वन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. वनडे संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नरही सामील होता. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरऐवजी कमिन्सला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (18 ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून कमिन्सची वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. गेल्या वर्षी टीम पेनला काढून टाकल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही पॅट कमिन्सकडे कसोटी संघाची कमान सोपवली होती. या निर्णयाबद्दल कमिन्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत.

यासोबतच कमिन्सने ऍरॉन फिंचच्या योगदानाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळताना मला खूप मजा आली. फिंचच्या कर्णधारपदातून मला खूप काही शिकायला मिळाले. फिंचच्या जाण्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान झाले आहे. जे भरणे सोपे जाणार नाही. आम्ही भाग्यवान असलो तरी आमच्याकडे वनडे संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत.

हे सुद्धा वाचा

3 Years child Police Complaint : मध्य प्रदेशात 3 वर्षाच्या चिमुकल्याने आईविरुद्ध नोंदवली पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

Breath Into The Shadow S2 : ‘या’ दिवशी प्राइम व्हिडिओचा ‘ब्रीद: इनटू द शॅडो’ सीझन 2 येणार!

SBI Bank Users : एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ

वॉर्नरला संधी मिळाली नाही
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सचे सर्वोत्तम कर्णधार म्हणून वर्णन केले आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, ‘पॅटने कर्णधार झाल्यापासून उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. कसोटीनंतर आता वनडेतही आम्ही पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही पॅट कमिन्स संघाचे नेतृत्व करणार आहे.

एकदिवसीय कर्णधार म्हणून पॅट कमिन्सचे आव्हान पुढील महिन्यातच सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाला 17 नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. टी-20 विश्वचषकानंतर फिंचही टी-20 क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. अशा परिस्थितीत पॅट कमिन्स तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार होऊ शकतो. दुसरीकडे, वॉर्नरबद्दल बोलताना, क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला कर्णधार बनवण्यासाठी त्याच्यावर घातलेली नेतृत्व बंदी उठवू शकते, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही आणि डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियन वनडे संघाची कमान सांभाळण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, मोठा काळ विचार केल्यानंतर अखेर ऑस्ट्रेलियाच्या वनडे कर्णधारपदावर एका खेळाडूच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाला असल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला आहे. विशेष म्हणजे कर्णधार पद कोणाकडे द्यावे यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने खूप विचार करून निर्णय घेतला आहे त्यामुळे आता त्यांना या निर्णयाचे फळ मिळणार का हे पुढाल वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकात कळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी