30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रीडाBCCI Meeting Decisions : बीसीसीआय घेणार मोठा निर्णय! प्रत्येक स्टेट क्रिकेट बोर्डाला...

BCCI Meeting Decisions : बीसीसीआय घेणार मोठा निर्णय! प्रत्येक स्टेट क्रिकेट बोर्डाला देणार प्रत्येकी 30 कोटी रुपये

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) आज (18 ऑक्टोबर) होणार आहे. या बैठकीत मंडळ अध्यक्षांकडून नूतन पदाधिकाऱ्यांच्या घोषणेसोबतच अन्य काही मोठे निर्णयही होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) आज (18 ऑक्टोबर) होणार आहे. या बैठकीत मंडळ अध्यक्षांकडून नूतन पदाधिकाऱ्यांच्या घोषणेसोबतच अन्य काही मोठे निर्णयही होणार आहेत. दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. देशातील सर्व राज्य क्रिकेट संघटनांना निधी देण्यापासून ते महिलांच्या आयपीएलसारख्या अनेक मुद्द्यांवर येथे चर्चा होणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय या बैठकीत राज्य घटकांना 30-30 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करेल. येथे ईशान्येकडील राज्ये आणि काही नवीन लहान राज्यांना दिलेली रक्कम थोडी कमी असू शकते. सर्व राज्यांच्या राज्य संघटनांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

घरच्या सामन्यांच्या होस्टिंगचा खर्च वाढला
कर्नल सीके नायडू ट्रॉफी, कूचबिहार ट्रॉफी आणि विजय मर्चंट ट्रॉफी यासारख्या काही प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धांसाठी होस्टिंग फी वाढली आहे. या सर्व टूर्नामेंटसाठी मॅच-डे फी 1 लाख रुपयांवरून 1.75 लाख रुपये करण्यात आली आहे. यासोबतच BCCI ने या देशांतर्गत स्पर्धांसाठी डे-नाईट मॅचेस आयोजित करण्यासाठी सबसिडी एक लाख रुपयांनी वाढवली आहे. ते प्रति सामना 3.50 लाखांवरून 4.50 लाख करण्यात आले आहे. फ्लडलाइट्सचा वाढता खर्च आणि इतर खर्च भागवण्यासाठी ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

3 Years child Police Complaint : मध्य प्रदेशात 3 वर्षाच्या चिमुकल्याने आईविरुद्ध नोंदवली पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

Breath Into The Shadow S2 : ‘या’ दिवशी प्राइम व्हिडिओचा ‘ब्रीद: इनटू द शॅडो’ सीझन 2 येणार!

SBI Bank Users : एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ

रॉजर बिन्नी अध्यक्ष होणार
रॉजर बिन्नी यांची आज बीसीसीआयच्या एजीएममध्ये बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे. ते बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार अशा मोठ्या पदांसाठी नवे पदाधिकारीही जाहीर केले जाणार आहेत. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या महिला आयपीएलबाबतही मोठा अपडेट समोर येऊ शकतो.

दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे बीसीसीआयचे नवे खजिनदार असणार आहेत. ते देखील आजच्या या मिटींगला उपस्थित राहू शकतात. विशेष म्हणजे आजच्या मिटींगमध्ये महिलांच्या आयपीएलबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयपीएलच्या काळात महिला क्रिकेटची एक छोटीशी स्पर्धा खेळवली जाते. मात्र, आता या स्पर्धेला आयपीएल इतके मोठे रुप देण्यात यावे की नाही याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय देशांतील सर्व क्रिकेट बोर्डांना खर्च करण्यासाठी किती निधी मिळणार हे देखील आजच उघड होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी