32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरक्रीडाBCCI : आता महिला खेळाडूंनाही मिळणार विराट कोहली इतकाच पगार! जय शहा...

BCCI : आता महिला खेळाडूंनाही मिळणार विराट कोहली इतकाच पगार! जय शहा यांची घोषणा

बीसीसीआय अस्ऱात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी (27 ऑक्टोबर) एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी एक ट्विट शेअर करत याबाबत घोषणा केली.

बीसीसीआय अस्ऱात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी (27 ऑक्टोबर) एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी एक ट्विट शेअर करत याबाबत घोषणा केली. एका मोठ्या घोषणेमध्ये, BCCI ने भारतीय महिला क्रिकेट संघाची मॅच फी पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीने केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही मोठी घोषणा केली आहे. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे जय शाह यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी 15 लाख रुपये उपलब्ध आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी ६ लाख रुपये दिले जातात.

बीसीसीआयची मोठी घोषणा
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना ३ लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला क्रिकेटपटूंनाही दिली जाणार आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल जय शहा यांनी सर्वोच्च परिषदेचेही आभार मानले आहेत. जय शाहने लिहिले, ‘भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुष संघाप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटी (15 लाख), एकदिवसीय (6 लाख), T20I (3 लाख) उपलब्ध असतील. वेतन समानता ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी अ‍ॅपेक्स कौन्सिलचे आभार मानतो.

हे सुद्धा वाचा

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे बळीराजाच्या भेटीला

Riteish-Genelia New Movie : रितेश देशमुखकडून जेनेलियाला खास पाडवा गिफ्ट

IND vs NED : नाणेफेक जिंकताच रोहित शर्माचा मास्ट्रस्ट्रोक! प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय महिला क्रिकेट संघाला आता एवढा पगार मिळणार आहे
भारतीय पुरुष संघातील खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी सहा आणि टी-20 सामन्यांसाठी तीन लाख रुपये मॅच फी मिळते. बोर्डाच्या या निर्णयानंतर आता करारबद्ध महिला संघातील खेळाडूंनाही समान मॅच फी मिळणार असून, त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला उभारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी महिला क्रिकेट खेळाडूंना पुरुषांच्या तुलनेत कमी मानधन मिळत होते. शिवाय पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना समाजात विशेष स्थान मिळण्यास कढीण होत असे. मात्र, आता या नव्या घोषणेमुळे पुन्हा एकदा महिला संघ पुरुष संघाच्या बरोबरीत येऊन उभा राहिला असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!