IPL 2024 सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चर्चेत आहे. मुंबई इंडियन्स ने IPLच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष मुंबई इंडियन्सकडे आहे. तसेच रोहितचे चाहते मुंबई इंडियन्सवर नाराज आहेत. (IPL 2024 Hardik Pandya hugs Rohit Sharma Video Mumbai-Indians Training Captaincy Controversy) सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स मध्ये फूट पडल्याची चर्चा होत असतांना आता मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, या व्हिडिओमुळे प्रकरण शांत व्ह्याच तर अजून संतापले आहे.
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये पडली फूट? हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी वर नाराज आहे जसप्रीत बुमराह?
मुंबई इंडियन्सने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू नवीन हंगामाची तयारी करतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू सोबत मुंबई संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या आणि जुना कर्णधार रोहित शर्मा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहितला पाहताच हार्दिक त्याला भेटायला गेला आणि त्याला मिठी मारली.
𝟰𝟱 🫂 𝟯𝟯#OneFamily #MumbaiIndians | @hardikpandya7 @ImRo45 pic.twitter.com/eyKSq7WwCV
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2024
मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यानंतर हार्दिक आणि रोहित पाहिल्याचं एकत्र दिसले. आता हा व्हिडीओ पोस्ट केल्याने चाहत्यांचा राग शांत होईल अशी अपेक्षा होती. पण त्याच परिणाम उलटाच होताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच रोहित शर्माचे चाहते अजून नाराज झाले आणि या व्हिडिओला बनावट म्हणत आहेत. या व्हिडिओखाली मुंबई आणि रोहितच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
IPL 2024 सुरु होण्याआधी उज्जैनला पोहोचला KL राहुल, महाकालचा घेतला आशीर्वाद आणि…
मात्र, अलीकडेच हार्दिकला रोहित शर्माशी संबंधित प्रश्नांना सामोरे जावे लागले, ज्यापैकी काहींची त्याने उत्तरे दिली, तर काहींवर तो पूर्णपणे मौन बाळगून होता.हार्दिकने 18 मार्च रोजी, मुंबईचा कर्णधार म्हणून पहिली पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्याने सांगितले की रोहित आणि त्याच्यामध्ये सर्व काही बरोबर आहे . कर्णधारपदाच्या या काळात रोहितची पूर्ण मदत मिळेल, असा विश्वास हार्दिकने व्यक्त केला.
मुंबई इंडियन्सचा आपला पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्ससोबत खेळणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू हार्दिकच्या नेतृत्वाखालील अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मुंबई इंडियन्सची टीम 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सराव करत आहे . मात्र, मुंबईचा स्टार खेळाडू आतापर्यंत प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेला नाही. आम्ही जसप्रीत बुमराह बद्दल बोलत आहोत. जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये सर्व काही ठीक नाही आहे.