32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरक्रीडाIND vs BAN : 'बांग्ला टायगर्स'ची डरकाळी फेल! भारत सेमी फायनलमध्ये

IND vs BAN : ‘बांग्ला टायगर्स’ची डरकाळी फेल! भारत सेमी फायनलमध्ये

ग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत विजय मिळवत भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा होता. अशा महत्त्वाच्या सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी विशेष कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.

सध्या टी20 विश्वचषक 2022 रंगात आहे. अशात बुधवारी (2 नोव्हेंबर) झालेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांत पराभव पदरी पडल्यानंतर भारताची सेमी फाय़नल मध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांवर पडदा पडत असल्याचे बोलले जात होते. अशा परिस्थितीत बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत विजय मिळवत भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा होता. अशा महत्त्वाच्या सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी विशेष कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. यावेळी भारताने पहिली फलंदाजी करत 20 षटकांत 184 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांग्लादेश सांघाने चांगली सुरुवात केली. मात्र, पावसाच्या व्यत्ययानंतर भारताने सामना फिरवत 5 धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या आहेत. केएल राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला आणि तस्किन अहमद आणि हसन महमूद यांनी सुरुवातीला दमदार गोलंदाजी करत भारतीय सलामी जोडीला अडचणीत आणले. येथे रोहित शर्मा (2) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मात्र, विराट अन् राहुलने अर्धशतके झळकावत भारताची धावसंख्या 184 पर्यंत नेली.

हे सुद्धा वाचा

Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!

Bacchu Kadu : आमदार बच्चु कडूंची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरूच; मतदार संघाला 500 कोटींचा निधी देणार

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात कोर्टाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच! संजय राऊतांची कोठडी वाढली

185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने पॉवरप्लेमध्ये शानदार फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज लिटन दासने संघासाठी सर्वाधिक धावा करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलण्याचे काम केले. लिटनने अवघ्या 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सामन्यांत पावसाने व्यत्य आणला आणि लक्ष्य 16 षटकांत 151 असे झाले. सामना परत सुरू झाल्यानंतर के एल राहुलचट्या भन्नाट रन आऊटने लिटन दासला बाद केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत बांग्लादेशी फलंदाजांना केवळ 146 धावांवर रोखले आणि सामन्यांत धमाकेदार विजय मिळवला.

दरम्यान, भारताने या विजयाच्या मदतीने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असल्याचे सल्पष्ट झाले आहे. शिवाय टीम इंडियाचा पुढील ,सामना 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. या सामन्यांत देखील विजय मिळवत भारतीय संघ चांगल्या फॉर्मसोबर सेमी फायनलमध्ये खेळण्यास उतरेल अशी अपेक्षा केली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!