33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रShivSena : राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची गर्जना होणार?; प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

ShivSena : राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची गर्जना होणार?; प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर अनेकजण उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांना पाठींबा देखील देत आहेत. मध्यंतरी संभाजी ब्रिगेडने देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी केली, त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील युतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याच पुढाकारामुळे रामदास आठवले यांच्याशी शिवसेनेची हातमीळवणी होऊन शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा राज्यात दिला गेला होता. शिवसेना-भाजप-रिपाई (आठवले गट) अशी युती त्यावेळी झाली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवसेनेकडे युतीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी शिवसेना आणि काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत अद्याप काही भूमिका घेतल्याचे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान २१ नोव्हेंबरला मुंबईत मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी एका कार्यक्रमात ठाकरे आणि आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी नेमकी उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ नोव्हेंबरला करण्यात आले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याची चिन्हं आहेत. त्यानिमित्ताने संभाव्य आघाडी संदर्भात ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर वंचित आणि शिवसेनेत युती झाली तर पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीची गर्जना महाराष्ट्रात ऐकु येऊ शकते.
हे सुद्धा वाचा :
IND vs BAN : बांग्ला टायगर्सची डरकाळी फेल! भारत सेमी फायनलमध्ये

Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. तर दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीने 2019 मध्ये एमआयएमसोबतची युती तोडली होती. आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व असून आम्हाला ते मान्य आहे, अशी भूमिका मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हातमीळवणी करणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी