33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्रीडाIPL 2024: MS धोनीचा राजीनामा, रुतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जचा नवा कर्णधार

IPL 2024: MS धोनीचा राजीनामा, रुतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जचा नवा कर्णधार

IPL 2024 सुरु होण्याच्या एका दिवसांआधी चेन्नई सुपर किंग्स ने आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. होय, यंदा महेंद्र सिंह धोनीच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात चेन्नईची टीम खेळणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून रुतुराज गायकवाड आहे. (IPL 2024 MS Dhoni Resigns, Ruturaj Gaikwad New Captain of Chennai Super Kings) 27 वर्षीय स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद भूषवले आहे. धोनीने 212 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. जडेजाने 8 तर रैनाने 5 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.

IPL 2024 सुरु होण्याच्या एका दिवसांआधी चेन्नई सुपर किंग्स (XSK) ने आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. होय, यंदा महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) ऐवजी दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात चेन्नईची टीम खेळणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून रुतुराज गायकवाड आहे. (IPL 2024 MS Dhoni Resigns, Ruturaj Gaikwad New Captain of Chennai Super Kings) 27 वर्षीय स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद भूषवले आहे. धोनीने 212 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. जडेजाने 8 तर रैनाने 5 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.

IPL 2024 चे सामने केव्हा, कुठे आणि कसे फ्रीमध्ये पाहू शकाल, जाणून घ्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे संपूर्ण तपशील

तुम्हाला माहिती असेल की, आयपीएल 2022च्या वेळी सुद्धा चेन्नई टीम ने एका दिवसांआधी आपल्या कर्णधाराची घोषणा केली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, पण त्याच्या नेतृत्वात चेन्नईची टीम चांगले प्रदर्शन करू शकली नाही. त्यानंतर जडेजाच्या जागी धोनीला हंगामात पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सरफराज खानबद्दल म्हटलं ‘असं’ काही

रुतुराज गायकवाडबद्दल जाणून घ्याच म्हटलं तर या खेळाडूने 2020 च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये 52 सामने खेळला आहे. चेन्नई फ्रँचायझी गायकवाडला एका हंगामासाठी 6 कोटी रुपये देत आहे. तर धोनीला 12 कोटी रुपये मिळत आहेत. अशाप्रकारे गायकवाडची आयपीएलमधील फी धोनीपेक्षा निम्मी आहे.

हार्दिक पांड्याने रोहित शर्माला मारली मिठी, मुंबई इंडियन्समध्ये ‘अशी ही बनवाबनवी…’

42 वर्षीय महेंद्र सिंह धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसके ने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 2023 च्या शेवटच्या हंगामातही विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर अंतिम फेरीत त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक 

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 वाजता
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 वाजता
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 वाजता
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
13. दिल्ली सुपर कॅपिटल्स वि चेन्नई किंग्स, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रिडर्स 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
17. गुजरात टायटन्स विरुद्ध  पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, 7.30 वाजता
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, 7.30 वाजता
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी