होळीचा (Holi 2024) सण 24 आणि 25 मार्चला साजरा केला जाणार आहे. होळीचा सण रंगांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गुलाल, रंग आणि पाण्यामध्ये भिजून होळीचा आनंद घेण्यात वेगळीच मजा येते. मात्र, आजकाल केमिकल आणि सिंथेटिक रंग बाजारात आले आहेत. (Holi 2024 follow these tips to take care hair) ज्यामुळे चेहऱ्यावर आणि केसांवर रंग लागल्यास ते काढणे कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत केस पूर्णपणे खराब होतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. (Holi 2024)
रंग खेळताना त्वचेला कसं जपाल; घ्या जाणून
जर तुम्हाला कुठल्याही काळजीशिवाय होळीच्या सणांचा आनंद घ्याचा आहे, तर तुम्हाला केसांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. तर आता आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही होळीच्या रंगाने तुमच्या केसांचे संरक्षण करू शकणार. आम्ही तुम्हाला अशा काही तेलांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे होळीच्या सणाला तुमचे केस खराब होण्याची शक्यता कमी होईल.
मोहरीचे तेल
केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. हे लावल्याने केसांना नैसर्गिक लुक येतो. याशिवाय केसांची डीप कंडिशनिंग करते. होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी हे तेल खूप प्रभावी आहे. थोडे मोहरीचे तेल गरम करून केसांना लावा. यामुळे रंग लवकर निघून जाईल.
जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…
ऑलिव तेल
होळी खेळण्यापूर्वी केसांना ऑलिव्ह ऑईल लावणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड आढळतात, जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. तथापि, केस किंवा त्वचेवर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
खोबरेल तेल
होळीच्या रंगांशी खेळण्यापूर्वी केसांना कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा. खोबरेल तेलामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना रंगांपासून वाचवतात. त्यात हायड्रेटिंग गुणधर्म देखील आढळतात, ज्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते.
बदाम तेल
तुम्ही केसांना बदामाचे तेलही लावू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड केसांना मॉइश्चरायझ करतात. हे तुमचे केस खराब होण्यापासून वाचवते. यामुळे केसांची वाढही होते.