30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रीडाPakistan : पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज लंडनमध्ये स्वखर्चाने उपचार घेतोय

Pakistan : पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज लंडनमध्ये स्वखर्चाने उपचार घेतोय

पाकिस्तानची (Pakistan) तिजोरी खाली झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत आहोत. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे.

पाकिस्तानची (Pakistan) तिजोरी खाली झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून आपण ऐकत आहोत. पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. नागरिकांचे खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्याही कामासाठी पाकिस्तानमध्ये पैशांची चणचण भासत आहेत. अशीच एक माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‍पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे पैसे नाहीत. ऑगस्टमध्ये श्रीलंकेबरोबर झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शाहीन अफरीदीच्या गुडघ्याला मार लागला. शाहीन अफरीदी एशिया कपमध्ये देखील टीमच्या बाहेर होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कंगाल झाले आहे. त्यामुळे ते आपल्या खेळाडूवर उपचार करू शकत नाही. स्वत:च्या पैशांमधून त्यांना उपचार करावे लागत आहेत. शाहीन अफरीदी हा पाकिस्तानचा महत्त्वाचा जलदगती गोलंदाज आहे. परंतु दुखापतीमुळे 2022 मध्ये तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीममध्ये त्याची निवड झाली आहे.

शाहीद अफरीदी स्वखर्चाने इंग्लंडमध्ये उपचार घेत आहे. मात्र शाहीन याच्यावर पीसीबीनेच उपचार करणे गरजेचे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शाहीन टी-20 टीममध्ये असता तर त्याने 70 टक्के विकेट घेण्याचे काम केले असते. पाकिस्तान संघात त्याचा नाव लौकीक आहे. मागच्या वेळी पहिल्या ओवरमध्ये त्याने‍ रोहित शर्माची विकेट घेतली होती. टीम-इंडियाला 10 विकेटने हरवले होते. शाहीद अफरीदी पाकिस्तानसाठी आतापर्यंत 40 सामने खेळला. 25 टेस्ट मॅचमध्ये त्याने 99 विकेट घेतल्या. तर 32 वनडे सामने त्याच्या नावावर आहेत. त्यामध्ये त्यांनी 6‍2 व‍िकेट घेतल्या. शाहीद अफरीदीला टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी केले आहे.

हे सुद्धा वाचा

Harsh Foundation : हर्ष फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो पोलिसांचे प्राण वाचले

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

अफरीदीच्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लंडनमध्ये यावर विशेष उपचार केले जातात. 15 ऑक्टोबरपर्यंत तो आपल्या टीम सोबत खेळू शकेल असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी