31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeव्यापार-पैसाRichest Man in the world : चर्चा तर होणारच! गौतम अदानी जगात...

Richest Man in the world : चर्चा तर होणारच! गौतम अदानी जगात ठरले दुसरे श्रीमंत व्यक्ती

जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील अंबानी, टाटा यांचे नाव आतापर्यंत घेण्यात येत होते परंतु गेल्या काही वर्षांपासून या सगळ्यांनाच मागे टाकत उद्योगपती गौतम अदानी जगातील ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

दरवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर होते. याच्याशी सर्वसामान्यांना काही देणेघेणे नसले तरीही याबाबत एक वेगळीच उत्सुकता ताणली गेलेली असते. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील अंबानी, टाटा यांचे नाव आतापर्यंत घेण्यात येत होते परंतु गेल्या काही वर्षांपासून या सगळ्यांनाच मागे टाकत उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांच्या उद्योगात मोठी भरारी घेत जगातील ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलोन मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखली जाते, त्यानंतर गौतम अदानींनी आपला नंबर लावला आहे. दरम्यान शुक्रवारी अदानींच्या संपत्तीत 5 अब्ज डॉलर्सने वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 155.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट आणि जेफ बेझोस या दोघांना सुद्धा मागे टाकून गौतम अदानी हे जगातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा मान मिळवला आहे. जगातील सगळ्याच श्रीमंत व्यक्तींमध्ये एलोन मस्क यांचे नाव घेतले जाते. सध्याच्या घडीला मस्क यांची संपत्ती 273.5 अब्ज डॉलर इतकी आहे, तर बर्नार्ड अरनॉल्ट यांच्याकडे सध्या 155.2 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असून जगातील ते तिसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची 149.77 एवढी संपत्ती असून ते चौथ्या स्थानावर गेले आहेत.

हे सुद्धा वाचा…

Harsh Foundation : हर्ष फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

Super Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवले; अन् न्यायालय कोपले !

दरम्यान, गुरुवारी भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले परंतु अदानी समुहाच्या कंपनीच्या शेअरने मात्र उसळी मारल्याचे दिसून आले, शेअर्समध्ये मोठी तेजी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये आदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 4.97 टक्क्यांनी सर्वाधिक वाढली. अदानी ट्रान्समिशन 3.27 टक्के, अदानी टोटल गॅस 1.14 टक्के, दानी ग्रीन एनर्जी 2.00 टक्के, अदानी पोर्ट्स 2.21 टक्के, अदानी पॉवर इट 3.45 टक्के आणि अदानी विल्मार 3.03 टक्के वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या व्यवसायात मोठी वाढ केली आहे. डायमंड ट्रेडिंगपासून सुरू झालेल्या प्रवासात कोळसा व्यवसाय आणि इतरही अनेक व्यवसाय सामील झाले आहेत,त्यामुळे अलिकडच्या वर्षांत त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार अदानींची आताची एकूण संपत्ती 149 अब्ज डॉलर इतकी आहे. यावर्षी 72.4 अब्ज डॉलरची वाढ त्यांच्या संपत्तीत झाली आहे, परिणामी सध्या देशात मोठ्या गुंतवणुकदारांमध्ये गौतम अदानींचे नाव आवर्जून घेण्यात येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी