30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : विराट कोहली लवकरच निवृत्ती घेणार?

Virat Kohli : विराट कोहली लवकरच निवृत्ती घेणार?

विराट कोहलीच्या निवृत्तीचे वृत्त निश्चितच क्रिकेटप्रेमींसाठी धक्का देणारी आहे, परंतु अद्याप यावर अधिकृतरीत्या विराट कोहलीकडून असे कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही त्यामुळे शोएब अख्तरने केलेले वक्तव्य कितपत खरे किती खोटे हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

अनेक क्रिकेट फॅन्सचा लाडका खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो, मात्र सध्या कोहली निवृत्तीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. गेले तीन वर्षे विराट कोहलीचा खेळ खराब चालल्याने त्याच्या खेळावरच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, मात्र यावेळच्या आशिया चषक 2022 च्या खेळात त्याने आपल्या दमदार खेळीने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली आणि उत्तम खेळाडूची चुणूक सुद्धा त्याने यावेळी दाखवून देत सगळ्यांच्या प्रश्नांना विराम दिला. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहलीने आपले नाव कोरले आहे. एवढ्या चांगल्या खेळीनंतर सुद्धा विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत वृत्त पुढे आले असून पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने याबाबत भाष्य केले आहे.

आशिया चषक स्पर्धेत दमदारी कामगिरी करुन पुन्हा आपल्या ट्रॅकवर येणाऱ्या विराट कोहलाच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे विराटप्रेमींमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. कोहलीच्या निवृत्तीचा विषय पहिल्यांदा पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने छेडला होता त्यानंतर आता शोएब अख्तर सुद्धा विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत बोलत आहे. याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला अलविदा करेल. क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विराट हा निर्णय घेऊ शकतो. विराटच्या जागी मी असतो तर, भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता, असे म्हणून विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे.

हे सुद्धा वाचा…

Robin Uthappa Retires : रोबिन उथप्पाने आंतररष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वीकारली निवृत्ती

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील नेते आढळराव पाटलांच्या अडचणीत वाढ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या झोपेवर‍ अजित पवारांचा सवाल !

विराट कोहलीचा गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेटबाबत काहीतरी बिनसले असून अत्यंत खराब कामगिरीमुळे अनेकांकडून त्याला नाराजीच्या तीव्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या परंतु यंदाच्या आशिया चषक २०२२ च्या खेळात चमकदार कामगिरी केल्याने अनेकांना पुर्वीचा विराट कोहली यावेळी अनुभवायास मिळाला. याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 104 सामन्यात 138 च्या सरासरीनं 5 हजार 584 धावा केल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या निवृत्तीचे वृत्त निश्चितच क्रिकेटप्रेमींसाठी धक्का देणारी आहे, परंतु अद्याप यावर अधिकृतरीत्या विराट कोहलीकडून असे कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही त्यामुळे शोएब अख्तरने केलेले वक्तव्य कितपत खरे किती खोटे हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी