29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयविधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

टीम लय भारी

मुंबई :- विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता दर्शवली जात होती. ही शक्यता आता खरी ठरली आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी विधानसभा अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करण्यात आले आहे (12 BJP MLAs have been suspended).

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्षांचा माईक ओढला. यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे सभागृहाचे वातावरण तापले आहे (The atmosphere in the hall is heated).

विरोधी पक्षनेत्यांची अध्यक्षांच्या दालनात दादागिरी, घोषणाबाजीने दालन घुमल

विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होते; फडणवीस आक्रमक

या सर्व प्रकारानंतर भास्कर जाधवांनी आपले मत सभागृहात मांडले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी या ठरवाचा निर्णय मतांनी घेतला. यानंतर हा ठराव बहुमतानी मंजूर करण्यात आला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले.

यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार…

12 BJP MLAs In Maharashtra Suspended For Abusing Assembly Speaker

आहे. तसेच या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे (A resolution has been passed that these MLAs will not be able to participate in any of the proceedings of the Assembly in Mumbai or Nagpur for the next one year).

12 BJP MLAs have been suspended
भाजपचे निलंबित आमदार

भाजपच्या ‘या’ 12 आमदारांना केले निलंबन

गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या 12 आमदारांना निलंबन केल्यानंतर भाजपामधील सर्वच नेते आक्रमक झाले होते. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, हा निर्णय आम्हाला मान्य नाही. यानंतर फडणवीस यांनी आम्ही या निर्णयावर बहिष्कार टाकतो असे म्हणत तेथून निघून गेले (Fadnavis walked away saying that he would boycott the decision).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी