30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयविरोधी पक्षनेते अध्यक्षांच्या दालनात आक्रमक, घोषणाबाजीने दालन घुमल

विरोधी पक्षनेते अध्यक्षांच्या दालनात आक्रमक, घोषणाबाजीने दालन घुमल

टीम लय भारी

मुंबई :- पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच सभागृहात गोंधळ सुरू होता. आरोप प्रत्यारोप करत एकमेकांना टोले, टीका सुरू होती. मात्र, यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी करत अध्यक्षांचा माईक ओढला (Party members came to the president office and shouted slogans and pulled the president mic). 

ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्षांचा माईक ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपने केला आहे (The BJP has claimed that there was no pushback in the House).

विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होते; फडणवीस आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; शिवसेनेतील ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितले. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले (BJP MLAs became aggressive).

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गोंधळात धक्काबुक्की झाली. त्यामुळे धक्काबुक्की करणाऱ्या या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे गोंधळी आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे, असे नबाब मलिक म्हणाले (Nawab Malik said that action should be taken against the confused MLA).

31 जुलै 2021 पर्यंत एमपीएसीच्या सर्व रिक्त जागा भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

ED hell-bent on creating adverse impression, prejudices against me: Anil Deshmukh

भुजबळ सभागृहात चुकीची माहिती देत होते. फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा घेतला. पण ऐकून घेतले नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. सभागृहाचे वातावरण तापले होते. पण बाचाबाची झाली नाही, असे गिरीष महाजन यांनी सांगितले. तर सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा आमदार संजय कुटे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी