28 C
Mumbai
Saturday, June 22, 2024
Homeमहाराष्ट्रअजित घोरपडेंची आमदार सुमनताईंवर टीका, ‘ज्यांना आमदारकी पेलली नाही, त्यांनी मला धनुष्यबाण...

अजित घोरपडेंची आमदार सुमनताईंवर टीका, ‘ज्यांना आमदारकी पेलली नाही, त्यांनी मला धनुष्यबाण पेलेल का असे विचारू नये’

लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात

तासगाव : यांनी मतदारसंघात पाच वर्षामध्ये एकसुद्धा जनतेची सभा घेतली नाही. लोकांची विकासकामे होत नाहीत. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत आहे. ज्यांना पाच वर्षे आमदारकी पेलता आली नाही, त्यांनी धनुष्यबाण पेलेल का असे मला विचारू नये, अशा शब्दांत शिवसेना – भाजपचे उमदेवार अजित घोरपडे यांनी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांच्यावर टीका केली.

ढवळी येथील प्रचार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

घोरपडे पुढे म्हणाले की, मतदार संघातील सिंचन योजना खासदार संजयकाका पाटील व मी पूर्णत्वास नेल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर जलसंपदा मंत्री असताना आम्ही पाठपुरावा केला. मिरज तालुक्यासह कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात महायुतीने विकास केला. मला मिरज व कवठेमहांकाळ तालुक्याने खुप काही दिले आहे. मी या तालुक्यासाठी पाणी दिले.

खासदार संजयकाका पाटील यांनीही राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. आपले वय काय आपण टीका कुणावर करतो. वय किती हे तपासून बोलावे, असा टोला संजयकाकांनी रोहित पाटील यांना लगावला. राजकारण करत असताना जनतेचे आशीर्वाद घेऊन मी राजकारण करत आलो आहे. घोरपड़े सरकारही जनतेचे आशीर्वाद घेऊनच राजकारण करत आहेत. स्व. आर. आर. आबा पाटील व माझा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. पण आबांचे निधन झाल्यावर मी आमदार सुमनताई यांच्यावर टीका केली नाही. माझी ती संस्कृतीही नाही. पण आमदारांच्या आडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घाणेरडे राजकारण करतात त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे संजयकाका म्हणाले.

यावेळी सावर्डे गावचे सरपंच प्रदीप माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मतदारसंघाचा विकास 50 वर्षांपासून रखडला होता. तो विकास पाच वर्षात भाजप – शिवसेना युतीने करून दाखवला. आमच्यासाठी खासदार संजय काका हे दैवत आहेत. संजय काका यांचा शब्द हा अखेरचा शब्द असेल. शिवसेना उमेदवार अजितराव घोरपडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर कवठेमहांकाळचे भाजप नेते हायुम सावनूरकर यांनी भाषणात सांगितले की, मतदार संघातील सहानुभूतीची लाट खल्लास झाली आहे. कवठेमहांकाळच्या पूर्व भागात म्हैशाळची पाणी योजना डोंगरमाथा फोडून पूर्ण केली. त्या डोंगरमाथ्याच्या दगडाला जाऊन विचारा अजितराव घोरपडे कोण आहेत. त्यामुळे मतदार संघात सहानुभूतीची लाट आता चालणार नाही अशी जोरदार टीका त्यांनी सुमनताई यांचे नाव न घेता केली.

वंजारवाडीचे शिवसेना नेते अरुण खरमाटे यांचेही यावेळी भाषण झाले. विसापूरचे सुनीलभाऊ पाटील यांनी  आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे सुरेशभाऊ पाटील (स्व. आर आर आबांचे भाऊ) यांच्यावर चौफेर टीका केली.

त्यानंतर  शिवसेना उमेदवार अजितराव घोरपड़े यांचे सुपुत्र व् युवकांचे व् शिवसैनिकांचे आयडाँल राजवर्धन घोरपड़े यांनी रोहितदादा आर पाटील यांची खिल्ली उडविली.

यानंतर वायफळे गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांनीही राष्ट्रवादीचे सुरेशभाऊ पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होती, पण आमच्यात मतभेद नाहीत. तासगाव तालुक्यातुन अजितराव घोरपड़े यांनाच लीड देऊ.

यावेळी बजरंग भाऊ पाटील, सुनिताताई मोरे, भारत डुबुले, हायूम सावनूरकर, सुनिल भाऊ पाटील, साहेबराव पाटील,  नगराध्यक्ष विजय सांवत, कवठेमहांकाळचे नगराध्यक्ष पंडित दळवी, तासगावचे नगरसेवक जाफरभाई मुजावर, अविनाश पाटील, अनिल कुत्ते, सचिन गुजर, दिग्विजय पाटील, शिवसेनेचे दिनकर पाटील, संदीप शिंत्रे, श्रीकांत चव्हाण, भिमराव भंडारे, प्रविण धेंडे, शोभा गावडे, रेखाताई जाधव, दिलीपभाऊ पवार, भोला मानकर, नितिन पाटील सावर्डे,  अविनाश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सभेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. घोरपडे यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून यावेळी सुमनताईंना निवडणूक सोपी राहणार नाही, अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांमधून व्यक्त केल्या जात होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी