31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय“आया-बहिणी घरदार सोडून…” वडेट्टीवारांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

“आया-बहिणी घरदार सोडून…” वडेट्टीवारांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

10 फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आशा वर्कर्स संघटनेने आपल्या मागण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. संघटनेनेकडून पगारवाढीचा अध्यादेश सरकारने काढावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र सरकारकडून आंदोलनाची कोणतीच दखल घेतलेली नाही, त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रश्न उपस्थित केला, त्यावर अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. 

मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्कर्सच्या आंदोलनासाठी महाराष्ट्र विविध जिल्ह्यांतून असंख्य महिला आल्या आहेत. त्यांची मागणी एकच आहे की, “तीन महिन्यांपूर्वी आम्हाला आमचं आंदोलन संपवण्यासाठी म्हणून दिलेलं लेखी आश्वासन सरकारने पूर्ण करावं, तसा शासनादेश काढावा.” अशी मागणी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आहे. त्याच मागणीसंबंधी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. 

हेही वाचा : Ajit Pawar Letter : “…आणि म्हणून मी वेगळी भूमिका घेतली”, अजित पवारांनी जनतेला लिहिलं खुलं पत्र

वडेट्टीवार म्हणाले की, “आया-बहिणी घरदार सोडून गेल्या कित्येक दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार आहे का, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.” अंगणवाडी सेविका व आशा वर्करच्या मागणीवरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आशा वर्करच्या आंदोलनावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. 

हेही वाचा : एकनाथ शिंदे सरकार कंत्राटदारांचे, घोटाळबाजांचे; विजय वडेट्टीवारांचे घणाघाती आरोप

विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आशा वर्कर यांच्या आंदोलनावर भाष्य केले. आशा वर्कर यांची मुख्यमंत्र्यानीही भेट घेतली, त्यांच्या मागणीनुसार आंदोलकांनी चर्चेला पुढे यायला हवं. चर्चेतून मार्ग निघत असतो, आंदोलकांनी थोडं पुढं-मागं व्हावं… शेवटी आपल्या इतरही आर्थिक बाजूंचा विचार करावा लागतो. आशा वर्कर्स ह्या आमच्या बहिणीच आहेत, जर सरकार दोन पाऊले मागे येत आहे, मग तुम्हीही दोन पाऊलं मागे यायला हवं.”

हेही वाचा : अभिनेता किरण मानेंची पोस्ट, तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

राज्यात राष्ट्रीय आरोग्य मिशनने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही 70 हजारांपेक्षा जास्त महिला आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात.हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 12 जानेवारीपासून राज्यभरात संप पुकारला आहे. 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलक आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी ठाणे गाठले होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाण्यात आलेल्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ. मात्र, त्यानुसार कारवाई होत नसल्याने हजारोंच्या संख्येने ठाण्यात आलेल्या या आंदोलक महिलांनी मुंबईचं आझाद मैदान गाठले आणि १० फेब्रुवारीपासून तिथेच धरणे आंदोलन सुरु केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी