33 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीय“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

टीम लय भारी

पुणे:- चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “मी फार छोटा माणूस…” मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनी बोलावं, मी अतिशय छोटा आहे; अजित पवारांचा टोला पुण्यातील शाळा आणि करोना आढावा बैठकीवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.(Ajit Pawar imposed toll BJP, “I am a very small person””)

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील “नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला.या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोधण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

अजितदादांनी विठ्ठलाला घातले साकडे

उपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

Ajit Pawar on Amol Kolhe controversy: No point examining past decisions

त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते . असे ते म्हणाले होते.

दरम्यान त्यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. माझ्यासारखा लहान माणूस काय बोलणार? “चंद्रकांत पाटील इतकी मोठी व्यक्ती आहे की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एका छोट्या अजित पवाराने टीका करणं काही बरोबर नाही. मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनी बोलावं, मी अतिशय छोटा आहे,” असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी