27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्र७३ वा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राष्ट्रध्वज फडकवला

७३ वा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राष्ट्रध्वज फडकवला

टीम लय भारी

मुंबई:- २६ जानेवारी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवला.उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि विश्वास व्यक्त केला की संपुर्ण देश आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो.(CM Uddhav Thackeray hoisted the National Flag in Mumbai)

ते म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आणि संघर्षामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले.ध्वजारोहण सोहळ्याला ठाकरे यांच्या पत्नी रश्मी, मंत्री पुत्र आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या परेडची खासियत जाणून घेऊया

टोकियो ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांनी एकत्र येत गायलं राष्ट्रगीत

यंदा राजपथावरची परेड ठरणार खास! महाराष्ट्रातील जैवविविधतेचे होणार अनोखे दर्शन

Maharashtra CM Uddhav Thackeray, NCP chief Sharad Pawar pay tributes to Netaji Subhas Chandra Bose, Bal Thackeray on their birth anniversaries

यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिवाजी पार्क  येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानेमानेच्या मणक्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत.१२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या.

मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी उत्तर दिलं होतं. “मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं होतं. अखेर आज अडीच महिन्यांनंतर आज मुख्यमंत्री प्रथमच जाहीर कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते आज काय बोलणार याकडे सर्वांचचं लक्ष लागलेलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी